20 हजारांची लाच घेताना कर अधिकारी अँटिकरप्शनच्या ट्रॅपमध्ये अडकला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

20 हजारांची लाच घेताना कर अधिकारी अँटिकरप्शनच्या ट्रॅपमध्ये अडकला.

 20 हजारांची लाच घेताना कर अधिकारी अँटिकरप्शनच्या ट्रॅपमध्ये अडकला.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रमेश अमृता बुधवंत (वय 57 रा खराडी पूणे) या अहमदनगर मधील राज्य कर अधिकारी यांना जीएसटी करापोटी श्रीरामपूर येथील एका दुकानदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून या पथकाचे पोलिस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुखदेव मुरकुटे पोलीस नाईक मनोज पाटील यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, श्रीरामपूर शहरातील एका दुकानदाराचा मोबाईल फोन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विक्रीचा व्यवसाय आहे. या दुकानदाराने त्यांचे व्यवसायातील उलाढाली संबंधाने विक्रीकर ताळेबंद सादर केला होता. या ताळेबंदामध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या. राज्य कर अधिकारी रमेश बुधवंत (रा. खराडी, पुणे) यांनी दुकानदारांना वाढीव कर भरणा करण्याबाबत नोटीस दिली होती. नोटीस निरस्त करणे तसेच दुकानदारांना जी. एस. टी. करापोटी परतावा मिळवून देण्याकरिता मदत करण्यासाठी राज्य कर अधिकारी बुधवंत यांनी 50 हजारांची मागणी केली.
दुकानदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अतिरिक्त अधीक्षक एन. एस. न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जी. एस. टी. भवन येथे सापळा लावला. बुधवंत यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोडी अंती 35 हजार रुपये रक्कम घेण्यास तयार झाला. या रक्कमेचा पहिला हप्ता 20 हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर पंचासमक्ष पकडण्यात आले.

No comments:

Post a Comment