कृषी क्षेत्रावर फोकस, बळीराजाला दिलासा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 1, 2022

कृषी क्षेत्रावर फोकस, बळीराजाला दिलासा.

 केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर. कृषी क्षेत्रावर फोकस, बळीराजाला दिलासा.

मोबाईल चार्जर, कॅमेरा लेन्स इत्यादी इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त कपडे व चामड्याच्या वस्तू स्वस्त.


दिल्ली-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एक फेब्रुवारी रोजी संसदेत देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. जवळपास दीड तास अर्थसंकल्प मांडण्यास लागला असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदि इलेक्ट्रिक वस्तूंसह कपडे व चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. या शिवाय कृषी क्षेत्रावर या अर्थ संकल्पात विशेष फोकस करण्यात आला असून त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सादर केलेल्या अर्थ संकल्पात क्रिप्टो करेंसीच्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये कॅमेरा लेन्स, चार्जर स्वस्त होणार आहेत. इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये कोणताही बदल होणार नसून मागील वर्षीप्रमाणेच इन्कम टॅक्स स्लॅब राहणार आहे. स्टार्टअप उद्योगात तरुणांना प्राधान्य देणार आहे. विविध शहरात मेंटल हेल्थ सेंटर उघडण्यात येणार आहे.पोस्ट ऑफिस मध्ये एटीएम सेवा मिळणार आहे. देशातील जवळपास एक लाख पोस्ट ऑफिस मध्ये डिजिटल बँकिंगची सेवा देण्यात येणार आहे.एक देश एक रजिस्ट्रेशन सुरू होणार असून प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन देशात कुठेही करता येणार आहे..उद्योगात तरुणांना मोठी संधी मिळणार आहे.
आरबीआय डिजिटल करन्सी आणणार. एलआयसीचा आयपीओ येणार तसेच पेन्शन करमुक्त होणार आहे. इंधना वरील आयात शुल्कात बदल होणार असून अर्थसंकल्पाच्या तपशीलातून मिळणार स्पष्टीकरण, निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता. सहकारी संस्थांमधील कराचा दर पंधरा टक्क्यावर, कर बुडव्यांची संपत्ती सरकार जप्त करणार, करचोरी करताना पकडला संपत्ती होणार जप्त, चामड्याच्या वस्तूसहमोबाईल चार्जर कॅमेरा लेन्स होणार स्वस्त, परदेशातून येणारी यंत्रसामग्री होणार स्वस्त, शालेय शिक्षणासाठी 100 चॅनेल्स, रेल्वे-रस्ते उभारणी साठी मोठी गुंतवणूक करण्यात येणार, पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची तरतूद.. 80 लाख घरे बांधणार, पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी..
मागास 112 जिल्ह्यासाठी विशेष निधीची तरतूद, तेलबिया निर्मितीसाठी प्रोत्साहन..हमीभावासाठी 2  लाख कोटींची तरतूद. देशात 60 लाख नव्या नोकर्‍यांची निर्मिती करणार..राज्यांच्या भांडवली गुंतवणुकी साठी एक लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment