आरोपीकडून चोरी केलेले 90,000 रु पुन्हा मिळवून दिले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 7, 2022

आरोपीकडून चोरी केलेले 90,000 रु पुन्हा मिळवून दिले.

 आरोपीकडून चोरी केलेले 90,000 रु पुन्हा मिळवून दिले.

गाडीचा धक्का लागल्याचा बहाना..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः “तुमच्या गाडीचा आम्हाला धक्का लागला” असं बोलण्यात गुंतवून ठेवून गाडीतील ठेवलेली रक्कम चोरणार्‍या आरोपी जिग्नेश दिनेश खासी त्याच्याकडून 90,000 रु. जप्त करून फिर्यादी पोपटराव शेंडगे रा.भूषण नगर केडगाव यांचेकडे कोतवाली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने सुपूर्द केली आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी नामे केतन पोपटराव शेंडगे रा भुषन नगर केडगाव अहमदनगर यांनी फिर्याद दिली की ते त्यांचे शेतीचे आलेले पैश्याची एफ डी करण्याकरीता महात्माफुले चौक मार्केट यार्ड येथुन रोडने त्यांचे इनोव्हा गाडीने जात असताना त्यांना एका मोटार सायकल वरील दोन हेल्मेट स्वारांनी तुमच्या गाडीचा आम्हाला धक्का लागला असे म्हणुन बोलण्यात गुंतवुन त्यांचे गाडीतील ठेवलेली त्यांची रोख रक्कम चोरुन नेली होती. त्या प्रमाणे त्यांनी दिलेल्या फिर्यादी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं। 462/2021 भादवि कलम 37 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे हे करत असताना तपासा दरम्यान विशेष परिश्रम घेवुन कोतवाली पोलीसांनी युनिकॉन मोटार सायकल वरिल हेल्मेट गँग अटक करुन तपासा दरम्यान आरोपी नामे जिग्नेश दिनेश घासी याच्या कडुन फिर्यादी यांची चोरी केलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here