आ. संग्राम जगताप यांना काँग्रेसकडून महापुरुषांच्या पुस्तकांची भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 10, 2022

आ. संग्राम जगताप यांना काँग्रेसकडून महापुरुषांच्या पुस्तकांची भेट.

 आ. संग्राम जगताप यांना काँग्रेसकडून महापुरुषांच्या पुस्तकांची भेट.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र भेट पाठविले आहे. त्याच बरोबर धर्मवीर संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांवरील पुस्तके भेट दिली असून महापुरुषांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला काँग्रेसने आमदारांना दिला आहे.
कुरियरद्वारे ही भेट काँग्रेसने आमदारांच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या आवारात असणार्‍या संपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवली आहे. यामध्ये गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता ? इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार यांचे शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे ?, शिवछत्रपती - एक मागोवा या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचा समावेश आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांवरील ’छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’ काँग्रेसने त्यांना दिला आहे.महामानव, घटना शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेल्या ’माझी आत्मकथा’ हे पुस्तक काँग्रेसने आमदारांना उपलब्ध करून दिले असून यामध्ये आंबेडकरांचे निवडक संपादित लेख आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या ’शेतकर्‍याचा आसूड’ त्याचबरोबर फुले यांचा अतिशय गाजलेला ’गुलामगिरी’ हा ग्रंथ देखील काळे यांनी आमदारांना वाचनासाठी उपलब्ध करून दिला आहे.
...............

No comments:

Post a Comment