वाडिया पार्क येथील जलतरण तलाव व व्यायामासाठी क्रीडांगणे चालू करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 10, 2022

वाडिया पार्क येथील जलतरण तलाव व व्यायामासाठी क्रीडांगणे चालू करा.

 वाडिया पार्क येथील जलतरण तलाव व व्यायामासाठी क्रीडांगणे चालू करा.

माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः गेल्या दोन वर्षापासून वाडिया पार्क येथील जलतरण तलाव व क्रीडांगणे कोरोना या महामारीमुळे बंद होते.सध्याच्या स्थितीत नगर शहरातील दैनंदिन व्यवहार, बाजारपेठ, उद्याने, चित्रपटगृह पूर्व पदावर येत असून जलतरण तलाव व क्रीडांगणे सुद्धा सुरु करण्यात यावे, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
भगवान फुलसौंदर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना वाडिया पार्क येथील जलतरण तलाव व व्यायामासाठी क्रीडांगणे चालू करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरामधील जवळपास 90% नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. जलतरण तलाव व क्रीडांगणामुळे अनेक लहान मुले, मुली, शुगर व बी.पी चे पेशंटच्या आरोग्याचा प्रश्न सुटला आहे. सदर तलावामध्ये व क्रीडांगणावर शहरातील दिड ते दोन हजार लोक पोहणे व व्यायाम करत असून लवकरात लवकर जलतरण तलाव व क्रीडांगण सुरु करून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे.
यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, अशोक बाबर, रमेश ताराचंद्र खोपरा, रमेशलाल लुणिया, विजय गांधी, प्रदीप पिपाडा, अश्विन जामगांवकर, दर्शन शहा, वसंत राठोड, दत्ता जाधव, नितीन मुनोत, रसिक कटारीया, प्रकाश फिरोदिया, विकास गिरी, किशोर कटोरे  आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment