कायम सेवेतील कामगारांना दरमहा 86 हजार वेतन वाढ मिळावी - योगेश गलांडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 1, 2022

कायम सेवेतील कामगारांना दरमहा 86 हजार वेतन वाढ मिळावी - योगेश गलांडे

 कायम सेवेतील कामगारांना दरमहा 86 हजार वेतन वाढ मिळावी - योगेश गलांडे

एक्साईड बॅटरी कंपनीला 75 वर्ष पूर्ण.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एक्साईड बॅटरी कंपनी ला आज 75 वर्ष पूर्ण झाली असून कंपनी हीरक वर्ष महोत्सव साजरा करीत आहे. कामगारांच्या कष्टाच्या जोरावर कंपनीला गतवैभव प्राप्त झाले आहे. कंपनीच्या प्रगतीमध्ये कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना कामगार कायदे प्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आतापर्यंत कामगारांचे दोन करार झाले असून यावर्षी पुढील तीन वर्षाचा करारनामा कंपनी प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे.तरी कायम सेवेतील कामगारांना दरमहा 86 हजार रुपयांची पगार वाढ करावी अशी मागणी स्वराज  कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी कंपनी प्रशासनाकडे केली.
योगेश गलांडे पुढे म्हणाले की दिवसें-दिवस महागाई वाढत चालली आहे.याच बरोबर मनुष्याच्या आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहे. कामगार काम करत असताना त्याला  विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तरी कंपनीने कामगार करारानुसार त्यांचा हक्क त्यांना द्यावा. कंपनीच्या वतीने वैद्यकीय सेवा द्यावी. कामगारांचा पाच लाखापर्यंत चा विमा उतरवावा वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडून कामगारांची आरोग्य तपासणी करावी. आदीसह विविध मागण्या करारनाम्यात दिले आहेत तरी लवकरात लवकर करार नाम्याला मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एमआयडीसी तील स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने एक्साईड बॅटरी कंपनीतील कायम सेवेतील कामगारांचा तीन वर्षाचा करारनामा कंपनी प्रशासनाकडे सुपूर्द करताना अध्यक्ष योगेश गलांडे, जनरल सेक्रेटरी आकाश दंडवते,चिप ापरेटीग मॅनेजर अरविंद कुलकर्णी, प्रोडक्शन हेड संदिप मुनोत, एच, आर, हेड संतोष डबिर, स्वप्निल खराडे, प्रदीप दंहातोडे, वसिम शेख, रमेश शिंदे, जितेंद्र तळेकर, राजू दोर्गे, शशिकांत संसारे, अभिजित सांबरे, गोरक काकडे, नामदेव झेंडे, रमेश पोकळे, राम घुगे, सोमा शिंदे, अजिनाथ शिरसाठ, सागर बोरुडे, महेश जाजगे, सचिन कांडेकर, मोहित मिश्रा, दीपक परभने, योगेश वाले, रुपेश पोपळघट, राम कोरडे, सोमा दळवी, उमेश जंबुकर, सुनील देवकुळे, संतोष तोडमल, वसीम शेख, सचिन खेसे, सचिन भुसारी, कुष्णा सत्रे, ठाणगे , मोरे संतोष, व्यवव्हारे, भरत भस्मे, मुसळे, हर्षद बिरंगळ, अक्षय रहाणे, जोरवे , आप्पासाहेब बोंबले, भाऊ गांगर्डे,पोपट जगताप, राजु साळवे, प्रवीण शिंदे , देशमुख, हरी बुट्टे, उमाशंकर, महेश काळे, दादासाहेब माने, शरद थोरात, संदिप जमदाडे, शिवाजी चौरे, सोमनाथ बरबोले, फिरोज शेख, उद्धव शेळके, गिरगुणे मामा, योगेश भुसाळ, विशाल होळकर, बागल मामा, सुरेश महाले, झुंबड, संतोष वाघ, सप्रे, गव्हाणे, दिनेश वाघ, प्रदीप हिंगे, धनवटे, कारंडे, धनंजय फुंदे, विजय गावडे, वाल्मिक पाटील, शिवाजी कदम, विजय खरात, संतोष कव्हणे, गौरव लांडगे, विजय काळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment