राज्य सरकारच्या वाईन निर्णयाचा जामखेड मध्ये निषेध. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 15, 2022

राज्य सरकारच्या वाईन निर्णयाचा जामखेड मध्ये निषेध.

 राज्य सरकारच्या वाईन निर्णयाचा जामखेड मध्ये निषेध. 

 श्रीशिवप्रतिष्ठान चे तहसीलदारांना निवेदन 


जामखेड -
आघाडी सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या किराणा माल व मॉल मध्ये वाईन विक्री च्या निर्णयाचा राज्यात ठिकठिकाणी विरोध होत असुन त्याचे पडसाद जामखेड शहरातही उमटले आहेत 
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संभाजीराव भिडे प्रणित संघटनेच्या जामखेड तालुक्याच्या वतीने मा.  तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.  
महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय  समाज घातक व   उगवत्या पिढीला विनाशाकडे नेणारा असुन  शेतकरी हिताचे नाव देवुन महाराष्ट्राच्या संस्कृती व इतिहासाचा वारसा पुसुन महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र करण्याचा हा निर्णय आहे  त्याचा आम्ही निषेध करतो  सरकारने हा निर्णय मागे घेवून जनतेची माफी मागावी 
या मागणीचे निवेदन मा. तहसीलदार योगेश चंद्रे यांना देताना श्रीशिवप्रतिष्ठान चे  तालुका अध्यक्ष श्री पांडुरंग भोसले यांनी सांगितले  की महाराष्ट्र ही साधु संत शुर वीरांची भुमी असुन छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या राज्याचा ऐतिहासिक  वारसा कलांकीत करण्याच काम राज्यसरकारने वाईन म्हणजे दारू विक्रीचा निर्णय घेवून केले आहे त्याचा आम्ही निषेध करतो तसेच या निर्णयाने उगवती तरूण पिढी बरबाद होणार असल्याने हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा या साठी जनतेच्या भावना मा. तहसीलदारांनी राज्य सरकारला कळवाव्यात अशी विनंती केली. यावेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे भैय्या राळेभात गणेश जोशी, साईनाथ तनपुरे,  भाऊ पोटफोडे, विशाल पठाडे मनसचे प्रदिप  टाफरे यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment