भक्ती शक्ती महोत्सवाचा कीर्तनाचा जागर ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 15, 2022

भक्ती शक्ती महोत्सवाचा कीर्तनाचा जागर !

 भक्ती शक्ती महोत्सवाचा कीर्तनाचा जागर ! राज्यातील नामांकित कीर्तनकारांची उपस्थिती


जामखेड -
जामखेड येथील भक्ती-शक्ती महोत्सव समितीच्या वतीने दि १३ ते २० फेब्रुवारी दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रसिद्ध रामायणाचार्य ह भ प गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक व भागवत कथा प्रवक्ते ह भ प भगवताचार्य नंदकिशोर महाराज पुराणिक यांच्यासह राज्यातील नामांकित कीर्तनकार याची उपस्थिती राहणार असल्याची  माहिती भक्ति शक्ति महोत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पोकळे ,कोषाध्यक्ष दीपक महाराज गायकवाड यांनी दिली आहे
गेल्या  १३ वर्षपासून जामखेड शहरात भक्ती-शक्ती महोत्सव समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येते याहीवर्षी शहरातील ,शिवाजी नगर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेच्या  बाजूला असलेल्या प्रागंणात  भक्ती शक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भागवत कथा प्रवक्ते ह भ प भगवताचार्य नंदकिशोर महाराज रविवार दि १३ रोजी हभप शिवशाहीर आकाश महाराज भोंडवे, सोमवार दि १४ रोजी शिवशाहीर अविनाश महाराज वाघ,मंगळवार दि १५ रोजी शिवचरित्रकार विश्वनाथ महाराज वारंगे,बुधवार दि १६ रोजी शिवशाहीर वासुदेव महाराज आर्वीकर,गुरुवार दि १७ रोजी विद्यावाचस्पती वारकरी ज्ञानेश्वर महाराज कदम,शुक्रवार दि १८ रोजी योगीराज महाराज गोसावी, शनिवार दि १९ रोजी हभप डॉ विकासानंद महाराज मिसाळ,तर गुरुवार दि २० रोजी प्रसिद्ध रामायणाचार्य ह भ प गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होणार आहे
हा सप्ताहचे १४ वे वर्ष असून 8 दिवस हा सप्ताह दरम्यान प्रबोधनाचे मोठे काम होणार असून यात जास्तीत जास्त महिला नागरिक तरुण वर्गाने सहभाग घ्यावा यासाठी भक्ती-शक्ती महोत्सव समिती अध्यक्ष सोमनाथ पोकळे उपाध्यक्ष अभिमन्यू पवार स्वागताध्यक्ष अमित चिंतामणी कोषाध्यक्ष दीपक महाराज गायकवाड सचिव ऍड प्रवीण सानप ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रेय सोले पाटील ओंकार झेंडे मयूर नेटके शिवम पोकळे रवी बारस्कर अमित पोटे अण्णा मांजरे गोरख घनवट,हरिदास गुंड उत्कर्ष कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून कीर्तन महोत्सवात गरीब कुटूंबातील कुटुंबातील विवाह इच्छुक असणाऱ्यांचीही लग्न लावून देण्यात येणार असून जेवणाचा सर्व खर्च आयोजकांमार्फत करण्यात येणार आहे तरी ज्यांना  कुटूंबियांची परिस्थिती नाजूक असणाऱ्यांनी विवाहासाठी आयोजकांची संर्पक साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment