महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 14 फेब्रु.ला नगर दौरा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 12, 2022

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 14 फेब्रु.ला नगर दौरा!

 महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 14 फेब्रु.ला नगर दौरा!

जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकार्‍यांना दौर्‍यात सहभागी होण्याचे आवाहन.

अहमदनगर - महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांचा 14 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत राज्य दौरा आहे. अहमदनगर जिल्ह्यात ते 14 फेब्रुवारी रोजी भेट देणार आहेत.
या दौर्‍यात महासंघाचे संस्थापक तथा मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस इंजि. विनायक लहाडे, उपाध्यक्ष बाळासाहेब घोरपडे, मुंबई उपाध्यक्ष विष्णू पाटील, सहसचिव सुदाम टाव्हरे आदी पदाधिकारी अहमदनगर जिल्ह्यात येत आहेत. दौरा अत्यंत महत्त्वाचा असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकारी यांनी सहभागी होण्यासाठीचे आवाहन अहमदनगर जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे व राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे राज्याचे संघटन सचिव विठ्ठलराव गुंजाळ यांनी केले आहे.
दुपारी 1.30 वाजता जिल्हा परिषद कार्यालयास व इतर विविध कार्यालयास भेटी देऊन सायंकाळी 5 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व विभागांच्या अधिकार्‍यांची एकत्रित बैठक होणार आहे.
दौर्‍यात ते जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, डीडीआर कार्यालय, पाटबंधारे, बांधकाम, कृषी, आरोग्य, जीएसटी इत्यादी कार्यालयांना भेटी देणार असून अधिकारी-कर्मचारी यांच्या अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा विनिमय करणार आहेत. सेवानिवृत्तीचे वय 60 करणे, जूनी पेन्शन योजना, वेतनत्रुटी बाबतचा खंड 2 चा प्रलंबित अहवाल, 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी, प्रलंबित महागाई भत्ता, ई-प्रिमियमचा भरणा, राज्य कर्मचार्‍यांच्या संपास पाठींबा देणे पगारात भागवा अभियान इत्यादी जिव्हाळ्याच्या प्रश्नांसोबत अधिकारी कल्याण केंद्राच्या इमारतीची बांधकाम प्रगती, अहमदनगर जिल्हा समन्वय समिती व अधिकारी दुर्गा महिला मंचच्या जिल्हा कार्यकारिणीचे पुनर्गठन इ. विषयावर चर्चा विनीमय करून निर्णय घेण्यात येणार आहेत.


No comments:

Post a Comment