ऐतिहासिक भुईकोट किल्ला पर्यटन विकासासाठी 2 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 7, 2022

ऐतिहासिक भुईकोट किल्ला पर्यटन विकासासाठी 2 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग.

 ऐतिहासिक भुईकोट किल्ला पर्यटन विकासासाठी 2 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग.

आ. संग्राम जगतापांचे प्रयत्नाने 5 कोटी रुपये मंजूर.

भुईकोट किल्ल्याला सुमारे 500 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. मोगलांच्या काळापासून या किल्ल्याचा वापर राजघराण्यातील लोकांना तसेच राजकीय नेत्यांना बंदी ठेवण्यासाठी केला जात होता. महाराणी येसूबाई व त्यांची मुलगी भवानीबाई यांना याच किल्ल्यात बंदी करून ठेवले होते. इंग्रजांविरूद्ध मोठा रणसंगर सुरू झाला होता. 1942 ची चले जाव चळवळ जोर धरीत होती. तिचे नेतृत्व करणार्‍या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांना बंदी म्हणून ठेवले होते. नेहरु यांनी याच किल्ल्यात ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’नावाचा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला.

अहमदनगरमधील भुईकोट किल्ला 1490 मध्ये बांधल्याचा उल्लेख सापडतो. किल्ल्याभोवती बांधलेला तट मातीचा होता. नंतर 1560 मध्ये या किल्ल्याचे पक्के बांधकाम करण्यात आले. मोगलांच्या काळापासून या किल्ल्यात राजकीय बंदी ठेवण्यात येऊ लागले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे 1942 ते 1945 या कालावधीत पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, नरेंद्र राव यांच्यासह इतर 12 नेत्यांना ‘चले जाव’आंदोलनात येथे बंदीवासात ठेवण्यात आले होते. यावेळी बंदीवासात असताना पंडित नेहरु यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडीया’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह इंग्रजी राजवटीत अनेक स्वातंत्र्यवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, 500 पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुमारे 2 कोटी 90 लाख रुपये आत्तापर्यंत प्राप्त झाले आहे.भुईकोट किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे.याच बरोबर पर्यटनास देखील चालना मिळणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईकोट किल्ल्यात अनेक स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कारावास भोगत होते आज ही हा किल्ला मोठ्या
दिमाखात उभा आहे, या किल्ल्याचा विकास व्हावा हाच मानस डोळ्यासमोर ठेवून शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे विकासासाठी टप्प्या-टप्प्याने निधी प्राप्त होत असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

आ.संग्राम जगताप यांनी शासनाकडे निधी साठी पाठपुरावा करून पहिला हप्ता सुमारे 90 लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झाला आहे. दुसरा हप्ता ही काल 2 कोटी रुपयेचा भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी वर्ग झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. नगरचा हा किल्ला सध्या सैन्याच्या ताब्यात आहे. तो राज्य सरकारकडे देऊन त्याचे राष्ट्रीय स्मारक केले पाहिजे, अशी नगरकरांची मागणी आहे. नेहरूंनी वापरलेला बेड, त्यांच्यासाठी दिलेली मच्छरदाणी, साबणाचे खोके, त्यांनी वाचलेली पुस्तके जतन करून ठेवली आहेत.

No comments:

Post a Comment