पंजाब पोलिसांनीच पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती लिक केली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 6, 2022

पंजाब पोलिसांनीच पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती लिक केली.

 मोदींच्या सुरक्षा भंगप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.

भारतीय किसान संघाचा दावा.  पंजाब पोलिसांनीच पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती लिक केली.


नवी दिल्ली -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा काल फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला. आता, भारतीय किसान संघाने पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या उल्लंघनात आपली भूमिका मान्य केली आहे. भारतीय किसान संघाचे सुरजित सिंह फूल यांनी पंजाब पोलिसांनीच पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती त्यांना लीक केली असल्याचा खुलासा एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना केला असतानाच मोदी यांच्या पंजाब दौर्‍यामध्ये आढळलेल्या सुरक्षेतील त्रुटींबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला असून याप्रकरणी कारवाई करत पंजाब सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. यासोबतच उद्या सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा काल सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला. वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी या प्रकरणी सरन्यायाधीशांसमोर युक्तिवाद केला. न्यायालयाने याचिकेची प्रत पंजाब सरकारला देण्यास सांगितले. आता त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. पंजाब सरकारच्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या बुधवारी फिरोजपूर दौर्‍या दरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटींच्या सर्वसमावेशक चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. एका अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव गृह आणि न्यायमूर्ती अनुराग वर्मा यांचा समावेश असेल. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल सादर करेल.

No comments:

Post a Comment