प्रतिष्ठेच्या कोल्हापूर जिल्हा बँकेवर, सतेज पाटील-हसन मुश्रीफांच वर्चस्व. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 7, 2022

प्रतिष्ठेच्या कोल्हापूर जिल्हा बँकेवर, सतेज पाटील-हसन मुश्रीफांच वर्चस्व.

 प्रतिष्ठेच्या कोल्हापूर जिल्हा बँकेवर, सतेज पाटील-हसन मुश्रीफांच वर्चस्व.

संजय मंडलिक आघाडीला 3 जागा.


कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेची मतमोजणी पार पडली आहेकोल्हापूर जिल्हा बँकेतील सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीनं निवडणूक झालेल्या 15 जागांपैकी 11 जागा मिळवल्या आहेत.
राजेंद्र पाटील-यड्रावकर,राजू आवळे,विनय कोरे,सुधीर देसाई,संतोष पाटील,रणजितसिंह पाटील,भैया माने,स्मिता गवळी,निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने हे विजयी झाले आहेत. बिनविरोधच्या 6 जागा आणि निवडणुकीतील 11 जागा अशा एकूण 17 जागांसह हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी बँकेवर वर्चस्व मिळवलंय. तर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला तीन जागा मिळाल्या तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेतील सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीनं निवडणूक झालेल्या 15 जागांपैकी 11 जागा मिळवल्या आहेत. राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजू आवळे, विनय कोरे, सुधीर देसाई, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील,भैया माने,स्मिता गवळी,निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने हे विजयी झाले आहेत. बिनविरोधच्या 6 जागा आणि निवडणुकीतील 11 जागा अशा एकूण 17 जागांसह हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी बँकेवर वर्चस्व मिळवलंय.
शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला तीन जागांवर विजय मिळाला. राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडीकडून संजय मंडलिक,बाबासाहेब पाटील, अर्जुन आबिटकर विजयी झाले. तर, अपक्ष उमेदवार रणवीरसिंग गायकवाड देखील विजयी झाले आहेत.

No comments:

Post a Comment