कारभारी.. बाहेर पडा पण जरा जपून..आरोग्य विभाग. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 7, 2022

कारभारी.. बाहेर पडा पण जरा जपून..आरोग्य विभाग.

 कोरोनाची वावटळ कारभारी.. बाहेर पडा पण जरा जपून..आरोग्य विभाग.

काल दिवसभरात 1 लाख 17 हजार 100 नवे कोरोना रुग्ण...
 एकूण कोरोना रुग्ण. 3 लाख 51 हजार 63...
 ओमिक्रॉन बाधीतांचा आकडा 3 हजारांच्या पार...


नवी दिल्ली -
देशांमध्ये कोरोना रुग्णांची अक्षरक्षः सध्या वावटळ आली असून ती कधी जाणार याकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आरोग्य यंत्रणा नागरिकांना कारभारी.. बाहेर पडा पण जरा जपून अशी सावधगिरीच्या सूचना करत आहेत. काल दिवसभरात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढून 3 लाख 71 हजार 63 झाली आहे.
काल रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळले आहेत. 60 टक्के नव्या कोरोनाबाधितांची नोंद केवळ या तीन राज्यांमध्ये झाली आहे.
कोरोनाची तिसरी लाट जगभरात धडकल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर देशातही कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या साथीमुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या 4 लाख 83 हजार 178 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल 30 हजार 836 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 71 हजार 845 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाचे तीन कोटी 52 लाख 26 हजार 386 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर देशातील ओमिक्रॉनबाधितांचा आकडा तीन हजारांच्या पार गेला आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगाने वाढताना दिसत आहे. आता या व्हेरिएंटमुळे देशात दुसरा मृत्यू झाला आहे. ओदिशातील बोलांगीरमध्ये 55 वर्षांच्या एका महिलेचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका 73 वर्षांच्या वृद्धाचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला होता. या दोन्ही व्यक्तींनी बाधित होण्यापूर्वी विदेशवारी केलेली नव्हती.

No comments:

Post a Comment