11 वर्षीय मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 7, 2022

11 वर्षीय मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत!

 11 वर्षीय मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत!

अभिनेता सोनू सूदच्या आर्थिक मदतीने तिने केली अपंगत्वावर मात.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका 11 वर्षीय मुलीने आपल्या अपंगत्वावर मात केली आहे.कारण या मुलीच्या अवघड शस्रक्रियेसाठी सोनू सूदने आर्थिक हातभार लावला. त्यामुळेच या मुलीची शस्रक्रिया यशस्वी झाली आहे. जान्हवी शशिकांत वाबळे असं या मुलीचे नाव आहे.वाबळे कुटुंबाने सोनू सूद आमच्या कुटुंबासाठी देवदूतासारखे धावून आले.अशी भावना व्यक्त केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे वाबळे कुटुंब रहाते.जान्हवीच्या पाठीत लहानपणापासून कुबड निघाल्याने तिला अपंगत्व आले होते. दरम्यान अभिनेता सोनू सुदने तिच्या उपचारासाठी केलेल्या आर्थिक मदतीमुळे पुण्यात एका रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हि शस्रक्रियाही यशस्वी झाली असून जान्हवीची प्रकृती आता सुधारली असून तिचे अपंगत्व पूर्णपणे गेले आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये सोनू सूद शिर्डीला साई दर्शनाला आला होता, त्यावेळी त्याने शिर्डी आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच गरजवंतांना वैद्यकीय मदत करण्याची भावना व्यक्त केली होती. यावेळी सोनू सूद याचे कोपरगाव येथील मित्र सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांनी जान्हवीचे वडील शशिकांत वाबळे आणि सोनू यांची भेट घडवून आणली.यावेळी वाबळे यांनी सोनू सूदला सर्व परिस्थिती सांगितली.त्याने जाह्नवीच्या वडिलांची व्यथा ऐकून घेतली व त्यांना शस्रक्रियेसाठी आर्थिक मदत ही केली.
वाबळे कुटुंबाने सोनू सूद आमच्या कुटुंबासाठी देवदूतासारखे धावून आले.अशी भावना व्यक्त केली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद मागच्या वर्षभरापासून सातत्यानं चर्चेत आहे.सोनू सूदनं कोरोना काळात अनेक गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे लोक त्याला देवदूतच म्हणत आहेत.

No comments:

Post a Comment