विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पती व भाया गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 7, 2022

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पती व भाया गजाआड.

 विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पती व भाया गजाआड.

माहेरून जमीन खरेदीसाठी पैसे व सोन्याची अंगठीसाठी विवाहितेचा छळ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वाळुंज पारगाव येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी मयत विवाहितेचा पती गोरख काकडे व भाया रवींद्र काकडे यांना अटक करून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या पोलिस कस्टडी मध्ये असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे करत आहेत
सदर घटनेची हकीकत अशी की, नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळुज पारगाव येथील विवाहितेला जमीन खरेदी साठी पैसे आणावेत व सोन्याच्या अंगठ्या साठी सासरच्या लोकांकडून होणारी दमदाटी व त्रासाला कंटाळून एका विवाहेतेने आत्महत्या केली होती या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता
शरद गोरख काकडे व भाया  रवींद्र गोरख काकडे अशी आरोपींची नावे आहेत व शुभांगी शरद काकडे असे म्रुत विवाहेतेचे नाव आहे. लग्नावेळी सासरच्या कडून विविध मागण्या करण्यात आल्या होत्या शुभांगी सासरी आल्या नंतर तिला तिच्या माहेरहून जमीन करणे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये असे सांगून छळ सुरू होता तसेच नवर्याला पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी फक्त दिली बाकी काही दिले नाही असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ कायम सुरू होता.अशा छळास शुभांगी या विवाहेतिने कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये नातेवाईक वैशाली गुलदगड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपी विरुद्ध महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विवाहेतेचा मृत्यू झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे तिच्या माहेरच्या लोकांनी प्रचंड गर्दी केली होती सर्व परिस्थिती पाहता आरोपींना तत्काळ अटक करणे गरजेचे होते. बॉडी पीएम साठी गेल्यानंतर नातेवाईकांनी सिव्हिल च्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. घटनेचे गांभीर्य पाहून  सिव्हिल हॉस्पिटल येथे ग्रामीणचे  उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तात्काळ तेथे धाव  घेतली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धाव घेतली.
नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ पथक तयार केले आरोपीचा ठावठीकाणा गुप्त पद्धतीने माहिती करून घेतला त्यांना माहिती मिळाली की आरोपी हे महाल परिसरामध्येच आहेत अशी गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती लगेच महाल परिसरांमधून आरोपी शरद गोरख काकडे,रवींद्र गोरख काकडे या दोघा आरोपींना ख्रिस्त बाग चौक येथील महाल परिसरामधील नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण पोलीस,उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, सहाय्यक फौजदार भगवान गांगर्डे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल भानुदास सोनवणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल संगीता बडे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास इथापे या पथकाने दोघांना अटक केली.

No comments:

Post a Comment