नगर शहर नाभिक समाजाच्यावतीने जावेद हबीबच्या प्रतिमेस जोडो मारुन निषेध. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 8, 2022

नगर शहर नाभिक समाजाच्यावतीने जावेद हबीबच्या प्रतिमेस जोडो मारुन निषेध.

 नगर शहर नाभिक समाजाच्यावतीने जावेद हबीबच्या प्रतिमेस जोडो मारुन निषेध.

महिलेच्या डोक्यावर थुंकून हेअर कट केल्याचे नगरमध्ये पडसाद.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांने मुझफ्फरनगर येथे झालेल्या एका सेमिनार मध्ये महिलेचे हेअरकट करताना पाणी नसल्याने थुंकून हेअर कट केला. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून, नाभिक समाज व सलून व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी या कृत्याचा जाहीर निषेध होत आहे. हबीब यांने हेअर कट करताना महिलेच्या डोक्यावर थुंकून केलेल्या गैर कृत्याचे पडसाद शहरात उमटले. झारेकर गल्ली येथे शहर नाभिक समाजाच्या वतीने कृत्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. तर महिलांनी जावेद हबीबच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त केला.
सागर औटी म्हणाले की, जावेद हबीबच्या विचित्र कृत्याने सलून व्यवसायिकांकडे ग्राहक वर्ग वेगळ्या नजरेणे पाहण्याची शक्यता आहे. या बदनामीकारक कृत्याचा सलून व्यवसायिक निषेध करत आहे. या व्यवसायावर अनेक लोक पोट भरत असून, अनेकांना रोजगार मिळाला आहे. ज्या व्यवसायावर जावेद हबीब मोठा झाला, त्या व्यवसायात हेअर कट करताना थुंकणे निंदाजनक बाब आहे. यामध्ये सर्व सलून व्यावसायिकांचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. ज्योती कराळे यांनी महिलेच्या डोक्यावर जावेद हबीब याने थुंकून चुकीचा संदेश दिला आहे. महिलेच्या डोक्यावर थुंकून समस्त महिला वर्गाचा अपमान झाला असून, हा उन्मादपणाचे लक्षण असल्याचे, त्या म्हणाल्या.
यावेळी सागर औटी, जीवन सोन्नीस, नाभिक समाजाचे युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर निकम, कार्याध्यक्ष विशाल सैंदाणे, ज्योती कराळे, अनिता माने, सुप्रिया चौधरी, भाग्यश्री लवांडे, बापूसाहेब औटी, शहराध्यक्ष श्रीपाद वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष निलेश पवळे, योगेश गंगातिरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here