विनापरवाना जिलेटिन, स्फोटके, डेटोनेटरची वाहतूक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

विनापरवाना जिलेटिन, स्फोटके, डेटोनेटरची वाहतूक

 विनापरवाना जिलेटिन, स्फोटके, डेटोनेटरची वाहतूक.

स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 हजारांचा मुद्देमाल जप्त. 1 जण गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव शिवारात रुईखेल रोडवरील तरटी वस्तीजवळ विनापरवाना जिलेटिन कांड्याचे स्फोटके व डेटोनेटर बॉक्सची वाहतूक करणार्‍या देवेंद्र प्रल्हाद चंद शर्मा वय 30 वर्षे, रा.बाडी ता.विजयनगर जि. अजमेर (राजस्थान) हल्ली मुक्काम भानगाव ता.श्रीगोंदा जिलेटिन व डेटोनेटर सह 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घारगाव शिवारामध्ये जिलेटिन च्या काड्या व डेटोनेटर विनापरवाना व बेकायदेशीर रित्या वाहतूक होत असल्याची माहिती अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहिती  मिळाली होती अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथका मधील पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन मखरे,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर ,पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते या पथकातील कर्मचार्‍यांनी श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव मध्ये पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन सापळा लावला असता घोगरगाव शिवारातील रुईखेल जाणार्‍या रोडवरती  तरटे वस्ती जवळ पथकातील कर्मचारी आडोशाला थांबले काही वेळात 14: 45 च्या सुमारास रुईखेल कडून बातमीतील नमूद होंडा एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक चक 16 इए 5186 येताना दिसली पथकातील लगेच सदर मोटरसायकल थांबून मोटरसायकलवारास पकडून त्याचे नाव पत्ता गाव विचारले असता त्याने आपले नाव देवेंद्र प्रल्हादचंद शर्मा वय 30 राहणार बाडी ता विजयनगर जि-अजमेर (राजस्थान) हल्ली राहणार भानगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर असे असल्याचे सांगितले.
त्याच्या अंगाची झडती घेतली असता मोटर सायकलची झडती घेतली असता मोटरसायकलवर एका पांढर्‍या गोणीमध्ये व डिक्की मध्ये एक 39650 /   मुद्देमालामध्ये जिलेटिन व डीटोनेटर अशा वस्तू मिळून आल्या वरील प्रमाणे जिलेटिन काड्या व लेटर बॉक्स मिळून आल्याने सदर इसमास त्याच्या ताब्यात मिळून स्फोटके बाळगण्याचा व वाहतूक करण्याचा परवाना आहे का याबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच परवाना नसल्याबाबत सांगितले. सदर स्फोटके 2 पंचा समक्ष पंचनामा करून माला पैकी एक जिलेटिन व प्रत्येकी बॉक्स मधून प्रत्येकी दोन डेटोनेटर  तपासणी  करून घेऊन त्या आरोपीस मोटरसायकल सह व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या विरोधात  अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन विठ्ठल मखरे यांनी दिलेल्या फिर्यादीत मध्ये फिर्यादीनुसार इसम नामे देवेंद्र प्रल्हादचंद  शर्मा वय 30 राहणार विजयनगर जिल्हा अजमेर (राजस्थान) हल्ली भानगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर परवाना नसताना बेकायदेशीर रीत्या लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका होईल अशा रीतीने आपले ताब्यातील होंडा एचएफ डीलक्स मोटरसायकल क्रमांक चक 16 इए.5186 वर पांढरी गोणी मध्ये  जिलेटिन, डिटोनेटर वाहतूक करताना मिळून आला आहे.त्याच्या विरुद्ध भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन मखरे,पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे,पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते यांच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव परिसरामध्ये ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment