वाघ्या फाउंडेशनच्यावतीने सोमवारी निदर्शने... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

वाघ्या फाउंडेशनच्यावतीने सोमवारी निदर्शने...

 जनावरांच्या लिलावाला विरोध.

वाघ्या फाउंडेशनच्यावतीने सोमवारी निदर्शने...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर - महानगरपालिका कोंडवाडा विभागाने काही दिवसांपूर्वी जाहीर लिलाव नोटीस देऊन महापालिकेच्या कोंडवडा विभागाच्या ताब्यात असलेल्या जनावरांचा लिलाव 13  जानेवारी रोजी  ठेवला आहे. मात्र हा लिलाव आता वादात सापडला असून मुक्या प्राण्यांसाठी काम करणार्‍या वाघ्या फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी या लिलावला विरोध दर्शवत जनावरांच्या लिलावाचा अधिकार मनपाला दिला कोणी ? असा सवाल उपस्थित केला आहे. मुक्या जनावरांच्या लिलावाचा निषेध म्हणून सोमवारी वाघ्या फाऊंडेशनच्यावतीने महानगरपालिकेत निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती सुमित वर्मा यांनी दिली आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या कोंडवडा विभागा मार्फत शहरा मध्ये फिरत असलेल्या मोकाट जनावरांना पकडून त्या जनावरांना महानगरपालिकेच्या कोंडवाड्यात ठेवण्यात येते आणि त्या ठिकाणाहून ज्या मालकांचे हे जनावरे असतील त्यांनी दंड भरून घेऊन जाण्याची कारवाई करण्यात येते.मात्र जी जनवारे घेऊन जात नसतील त्या जनावरांचा लिलाव करण्यात येतो.

No comments:

Post a Comment