कत्तलखान्यातून गोवंशी जनावरांची मुक्तता. एकावर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

कत्तलखान्यातून गोवंशी जनावरांची मुक्तता. एकावर गुन्हा दाखल.

 कत्तलखान्यातून गोवंशी जनावरांची मुक्तता. एकावर गुन्हा दाखल.

कोतवाली पोलिसांची कारवाई...

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गोवंश हत्येसाठी नगर हे प्रमुख केंद्र बनत असून शहरात कत्तलीसाठी गोवंश जनावरे मोठ्या संख्येने आणले जात आहेत. झेंडीगेट मधील कसाई गल्लीत कत्तलीसाठी आणलेल्या आठ गोवंशीय जनावरांची मुक्तता करत कोतवाली पोलिसांनी जमील अब्दुल सय्यद (रा.घास गल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
झेंडीगेट येथील कसाई गल्लीमध्ये अमित कुरेशी याच्या वाड्याजवळ काही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती त्यांनी गजेंद्र इंगळे व गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांना कारवाईचे आदेश दिले पथकाने छापा टाकून जमील अब्दुल सय्यद घास गल्ली कोठला यांच्या ताब्यातून आठ वर्षीय लहान-मोठ्या जनावरांची सुटका केली ही जनावरे निसर्ग सृष्टी गोपालन संस्थेकडे जमा करण्यात आली आहे आरोपींविरोधात पोकॅा दीपक भागुजी रोहकले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र इंगळे, पोना योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलीम शेख, संतोष गोमसाळे, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, गणेश ढोबळे महिला पोलिस कॉन्स्टेबल कविता पुरी यांनी ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment