पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र इंगळे, सागर भांड पलायन प्रकरणी निलंबित. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 6, 2022

पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र इंगळे, सागर भांड पलायन प्रकरणी निलंबित.

 पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र इंगळे, सागर भांड पलायन प्रकरणी निलंबित.

पोलीस उपमहानिरीक्षक डॉ शेखर पाटील यांचा आदेश.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना कुविख्यात सागर भांड टोळीने राहुरी कारागृहातून पलायन केल्याप्रकरणी तब्बल वीस दिवसानंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यावर निलंबनाचा बडगा उभारण्यात आला आहे.
उपनिरीक्षक धकाराव यांची निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचे निवेदन काही सामाजिक संघटनांनी काल पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्यांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी होत असतानाच पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचे निलंबन झाल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निरीक्षक इंगळे यांच्याविरोधातील कारवाई बाबतचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठविला होता. यानंतर उपमहानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी निरीक्षक इंगळे यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे. 18 डिसेंबर 2021 च्या पहाटे राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून मोक्का गुन्ह्यातील आरोपी सागर भांडसह पाच जणांनी पलायन केले होते. यातील तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. आरोपींनी कारागृहातून पलायन केल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले. या घटनेची माहिती मिळताच उपमहानिरीक्षक डॉ. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली.
याप्रकरणी उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. काळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी चौकशी केली. काहींचे जबाब नोंदविले. चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक पाटील यांना सादर केला. यानंतर अधीक्षक पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्‍यांचे निलंबन केले होते.आरोपी पळून गेल्याप्रकरणी निरीक्षक इंगळे यांच्याबाबतीत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. तसा प्रस्ताव अधीक्षक पाटील यांनी उपमहानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांच्याकडे पाठविला होता. यानंतर निरीक्षक इंगळे यांंच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment