महापौरांनी ‘फेज-2’ साठी विशेष महासभा बोलवावी - नितीन भुतारे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 6, 2022

महापौरांनी ‘फेज-2’ साठी विशेष महासभा बोलवावी - नितीन भुतारे.

 महापौरांनी ‘फेज-2’ साठी विशेष महासभा बोलवावी - नितीन भुतारे.

चार-पाच महापौर बदलून गेले तरी फेज-2 योजना पूर्ण का होत नाही?

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर शहरातील फेज टु योजनेचे बारा वर्ष होऊन देखील काम पूर्ण का होत नाही याची आजपर्यंत कुठली माहिती जनतेसमोर आले नाही. त्यामुळे या कामाबाबत काम पूर्ववत पूर्णत्वास कधी येणार काम कधी पूर्ण होणार याची संबंधित माहिती ही नगरकरांना कळणे गरजेचे आहे. या कामाबाबत त्रुटी, काय आहेत, या कामाबाबत अडचणी काय आहेत, या कामाबाबत नित्कृष्ट कामाला जबाबदार कोण आहे . हे सर्व समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रश्नावर महापौरांनी विशेष महासभा बांलवून सर्व नगरसेवकांनी यावर दूध का दूध पानी का पानी करावे. व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे अहमदनगर शहरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. आपण नागरिकांच्या हितासाठी काळजी घ्यावी व जनतेला लवकरात लवकर नवीन जलवाहिनी सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी विनंती ह्या पत्राद्वारे मनसेचे नितीन भुतारे यांनी महापौर रोहिणीताई शेंडगे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

महापौरांना दिलेल्या निवेदनात भुतारे यांनी म्हटले आहे की,शहरातील फेज टु योजना होऊन जवळपास बारा वर्ष होत आले तरी देखील नगर शहरातील फेज-2 पाणीपुरवठा करणारी नवीन जलवाहिनी झालेली नाही. या कामाबाबत अनेक संभ्रम वेळोवेळी निर्माण झालेली आहेत. नागरिकांमध्ये सुद्धा याबाबत अनेक संभ्रम आहेत. पार्वती ठेकेदार संस्था व तापी ठेकेदार संस्था यांच्याकडून अनेक कामांमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे. अनेक ठिकाणी नित्कृष्ट काम झाल्याचे उघड झालेले. त्याबाबत या संस्थांना दंड देखील झालेला आहे.अंतर्गत जलवाहिनी हि काही ठिकाणी एक फूट खोल टाकण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी काम व्यवस्थित होत नसल्याचे आरोप देखील या ठेकेदार संस्थानवर झालेले आहेत. परंतु याची आजपर्यंत कुठेही दखल प्रशासनाने घेतलेले नाही. त्यामुळे या नगर शहरातील नवीन जलवाहिनी शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ही अडचणीत आलेलीे आहे. नळ कनेक्शनमध्ये सुद्धा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. संपूर्ण योजना ही व्यवस्थित पार पडत नाही हे वारंवार निदर्शनास येऊन देखील प्रशासन कंपनींना पाठीशी घालत असल्याचे आरोप अनेक संघटनांनी अनेक राजकिय पक्षांनी केलेले आहेत. अधिकार्‍यांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई संस्थांवर झालेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या योजनेच्या नावाखाली झालेला आहे.  बोगस नळ कनेक्शन घेण्याचे प्रकार शहरात सूरु आहेत. 

लवकरात लवकर नगर शहरातील जनतेला सुरळीत पाणीपुरवठा होईल याची काळजी घ्यावी. दोन दिवसाला नगर शहरातील जलवाहिनी फुटून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. जर प्रशासन सांगते 90 टक्के काम पूर्ण झाले तर पाणीपुरवठा विस्कळीत का होतो?  हा मोठा प्रश्न जनतेसमोर आहे. त्यामुळे जवळपास बारा वर्षे झाले चार ते पाच महापौर याठिकाणी बदलून गेले तरी देखील हे काम पूर्णत्वास गेले नाही. 

दरवर्षी शहरांतील अनेक भागात टँकर व्दारे पाणीपुरवठा सुरू असून दरवर्षी जवळपास एक कोटी रुपयांचे बील पाणी पुरवठा करणार्‍या संस्थेला द्यावे लागते.  त्यातही पाणी पुरवठा टँकर व्दारे किती होतो हा मोठा प्रश्न आहे. पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती करिता टेंडर प्रक्रिया न राबविता दरवर्षी सत्तर लाख रूपये खर्च होतात. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे नगर शहराच्या विकासासाठी नगर शहराला स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरिता आपण फेज टु या विषयावर विशेष महासभा बोलवावी व  फेज टु योजनेला येणार्‍या अडचणी व नित्कृष्ट कामाला जो कोणी अधिकारी, ठेकेदार, पदाधिकारी जबाबदार असेल ती सर्व सत्य परिस्थिती ही महासभेसमोर निदर्शनास येईल व त्यानंतर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. त्याकरिता आपण विशेष महासभा बोलवून जनतेला या गोष्टीच्या माध्यमातून लवकरात लवकर  सुरळीत पाणीपुरवठा कोणत्या दिवसापासून होईल हे जाहीर करावेत.

No comments:

Post a Comment