अत्यावश्यक सामान खरेदी करण्याकडे लोकांचा कल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 6, 2022

अत्यावश्यक सामान खरेदी करण्याकडे लोकांचा कल.

 अत्यावश्यक सामान खरेदी करण्याकडे लोकांचा कल.

धास्ती कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आता चर्चा सुरू आहे. लॉकडाऊन लागणार की काय? लॉकडाऊन ची व्याप्ती नगरकरांनी पहिल्या लाटेत चांगली अनुभवली आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लागेल याची भीती बाळगून नागरिकांनी घरात जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्यास सुरुवात केली असल्याचं दिसून येत असून तीन दिवसांपासून बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे.
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने धडक दिल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना मागील 7 दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ सर्वांसाठी चिंताजनक बनली आहे. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न नगरकरांच्या मनात आहे. त्यामुळे बाजारात खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्टोअर शेल्फ आणि ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरुन गरजेच्या वस्तू गायब झाल्या आहेत. दररोजच्या वापरात असणार्‍या अत्यावश्यक वस्तूंची ऑनलाईन विक्री मागील दिवसांत 15 टक्क्यांनी वाढली आहे.
कोरोना महामारी संक्रमणाला वेग आला आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मार्केटला जाण्याऐवजी ऑनलाईन शॉपिंगवर लोकांनी भर दिला आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी वाढली आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार, जवळपास सर्व प्रकारच्या वस्तू ऑनलाईन विक्रीत 15 टक्के वाढ झाली आहे. चॉकेलट, पेय, साबण, शॅम्पू, खाण्यापिण्याच्या वस्तू यांच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली आहे. सॅनेटायझर, एन95 मास्क यांचीही विक्री वाढली आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमधून धडा घेत ई कॉमर्स कंपन्यांनी यावेळी पहिल्यापासून तयारी केली आहे. अचानक वाढलेल्या मागणीनं कमाई चांगली होईल अशी आशा कंपन्यांना आहे. ई कॉमर्सच्या माध्यमातून होणारी विक्री 10-15 टक्क्यांनी वाढली आहे. जोपर्यंत कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा परिणाम राहील तोवर बाजारात हाच ट्रेंड राहिल. मागील 1 आठवड्यात पॅकेज्ड फूड आणि हायजीन प्रॉडक्टची विक्री दुप्पटीने वाढली आहे. तर एन95 मास्कच्या विक्रीत एका आठवड्यात 5 पट वाढ झाली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 90 हजाराहून जास्त रुग्ण आढळले. एक दिवसापूर्वी आढळलेल्या रुग्णांपैकी हा दुप्पट आकडा आहे. ओमायक्रॉन रुग्णांमध्ये वाढ होत 2630 रुग्ण समोर आले. त्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. मागील 24 तासांत एकूण रुग्णांपैकी 67 रुग्ण केवळ याच 5 राज्यात आढळले आहेत.

No comments:

Post a Comment