नागरिकांनी आपले कर्तव्य समजून शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा- उपमहापौर भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 31, 2022

नागरिकांनी आपले कर्तव्य समजून शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा- उपमहापौर भोसले

 नागरिकांनी आपले कर्तव्य समजून शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा- उपमहापौर भोसले

मनपाची बुरूडगाव व माळीवाडा झोनमध्ये स्वच्छता मोहीम

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शहर स्वच्छता उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मदत होत असते. संत गाडगेबाबा यांनी त्या काळात सुरू केलेल्या स्वच्छतेचा संदेश प्रत्येकाने घरोघरी घेऊन जावा. केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेबाबत विविध उपाय योजना करत आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे आले पाहिजे. नगर शहराच्या स्वच्छतेबरोबरच कार्यालयाची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे  असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी अहमदनगर महानगरपालिकेने सुरू केलेल्या नगर शहर स्वच्छता अभियाना अंतर्गत आज बुरुडगाव झोन क्र.4 व माळीवाडा झोन क्रमांक 2 येथील कार्यालय व परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यावेळी व्यक्त केले.

अहमदनगर महानगर पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शहर स्वच्छ अभियाना अंतर्गत बुरुडगाव झोन क्रमांक 4 व माळीवाडा झोन क्रमांक 2 येथील कार्यालय व परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी उपमहापौर गणेश भोसले, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, कार्यलाय विभाग प्रमुख नाना गोसावी, किशोर देशमुख आदीसह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment