दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या निलंबनाचे आदेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 31, 2022

दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या निलंबनाचे आदेश.

 दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या निलंबनाचे आदेश.

हप्तेवसुली संदर्भात व्हायरल ऑडिओ क्लिपची दखल घेत.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अवैध धंदेवाल्याकडून हप्तेवसुली संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि पोलीस हवालदार योगेश शिवाजी राऊत अशी निलंबित पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबनाचा आदेश काढला आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचार्‍यांमधील मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले आहे. पोलीस खात्याची बदनामी करणारे हे संभाषण आहे. त्यामुळे पोलिसांची समाजातील प्रतिमा मलिन झाली आहे. हे वर्तन बेशिस्त आणि निष्काळजीपणाचे असल्याचा अहवाल श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या संभाषणाच्या अनुषंगाने शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता.
या अहवालानुसार पोलीस नाईक वैरागळ आणि पोलीस हवालदार राऊत यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 25 आणि मुंबई पोलीस (शिक्षा व अपिल) 1956 चे कलम तीन नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधीक्षक पाटील यांनी दोघांना निलंबित केले आहे. या दोघांना पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली रहावे लागणार आहे. दोघांनाही निलंबित कालावधीत खासगी नोकरी किंवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही.दर शुक्रवारी कवायत मैदानावर हजेरी द्यावी लागणार असुन  त्यांना पोलीस उपअधीक्षक यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार आहे.

No comments:

Post a Comment