राहुरीत गोळीबार, एक जण ठार, 1 संशयित पोलिसांच्या ताब्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 31, 2022

राहुरीत गोळीबार, एक जण ठार, 1 संशयित पोलिसांच्या ताब्यात.

 राहुरीत गोळीबार, एक जण ठार, 1 संशयित पोलिसांच्या ताब्यात.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गोळीबाराची घटना घडली असून गावठी कटटयातुन गोळी झाडुन एकाचा खुन करण्यात आला आहे.प्रदिप एकनाथ पागिरे असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव असुन पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना घडली हा प्रकार कशातुन घडला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान गोळीबारा नंतर युवकाला तातडीने नगर मध्ये एका खाजगी रुग्णालयात नेले मात्र तो मृत झाला असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती मिळत आहे. 2 त्यानंतर मृत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. घटनेचे कारण अस्पष्ट असून एक संशयित पोलीसाच्या ताब्यात असल्याचे समजते, पोलिसांनी अजून याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

No comments:

Post a Comment