नगर दौंड महामार्गावर कार व ट्रकचा भिषण अपघात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 31, 2022

नगर दौंड महामार्गावर कार व ट्रकचा भिषण अपघात.

 नगर दौंड महामार्गावर कार व ट्रकचा भिषण अपघात.

आर.पी.एफचा जवान जागीच ठार.

पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली?
  श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी, तालुक्यातील प्रत्येक साखर कारखान्यावर जावून कारखाना पदाधिकारी व ऊस वाहतूकदार यांची बैठक घेतली होती. त्यावेळी ऊस वाहतूक करणार्‍या प्रत्येक वाहन चालकाने आपल्या वाहनाला रेडीअम, रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. अनेकांनी याची दखल घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे पोलिसांच्या आदेशाला वाहन चालकांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येते आहे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौंड रोडवरील महामार्गावर कार आणि ट्रक्टरच्या धडकेत आर. पी.एफचे जवान बाबासाहेब सूर्यभान करांडे (रा. दरेवाडी तानगर) हे जागीच ठार झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील काष्टी नगर-दौंड रोडवरील महामार्गावर शिवशक्ती दूध डेअरीजवळ आज पहाटे बाबासाहेब करांडे कारने ( एम. एच. 16 बी. एच. 3858) जात होते. यावेळी कारची ट्रक्टरला पाठीमागून जोराची धडक बसली. यामध्ये जवान कारंडे यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर ट्रक्टर चालक ट्रॉली जागेवर सोडून ट्रक्टर घेऊन पळून गेला. या ट्रक्टरला रिफ्लेक्टर नसल्यामुळे चालकाला पुढील वाहन दिसले नाही म्हणून हा अपघात झाल्याची चर्चा आहे. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारची पुढील बाजू पूर्णतः चक्काचूर झाला होता. अपघातानंतर कारंडे यांना वेळेवर मदत मिळाली नाही. सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी हा अपघात पाहिल्यानंतर त्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना दिली. करांडे हे राष्ट्रीय सायकलपट्टू खेळाडू ओम करांडे यांचे वडील होत. श्रीगोंदा पोलिसांत या अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले करीत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here