शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प.

 नुतन वर्षाच्या शहरवासियांना महापौरांच्या हार्दीक शुभेच्छा.

शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नूतन वर्षानिमित्त महापौर रोहिणी शेंडगे यांनी नागरी सुविधा देणारे विकासाचे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवितांना दुरगामी व योग्य परिणामकारक ठरणार्‍या महत्वाच्या कामासाठी शहर व उपनगरांमध्ये नविन वर्षामध्ये महत्वाचे प्रकल्प मार्गी लावुन शहर स्वच्छ व सुंदर तसेच खड्डेमुक्त करण्याचा व इतर मोठे प्रकल्प पुर्ण करण्याचा संकल्प केला आहे.
नगर शहर व उपनगरांमधील नागरीकांसाठी डिपी मुख्य रस्त्यांचे मजबुतीकरण डांबरीकरण व सिमेंट कॉक्रीटीकरणाचे करणार, शहरातील गोरगरीब नागरिकांची आरोग्य सेवा चांगली रहावी यासाठी शहराचे मुख्य कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल तसेच इतर प्राथमिक आरोग्य केंद्रे यामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करुन सर्वांना लाभ देणार, शहराच्या महत्वाच्या दृष्टीने असणारा आरोग्याचा प्रश्न टप्पा 2 भुयारी गटर योजना राबविण्याचा तसेच, सर्व नागरीकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व जिव्हाळयाचा असलेला अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.
फेज - 2 अमृत योजनेमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले असुन वसंत टेकडी येथे पाणी आणण्यासाठी नविन विद्युत पंप बसवुन शहराला पाणीपुरवठा वेळेवर देणेसाठी संकल्प आहे, महानगरपालिकेचा पिंपळगाव माळवी तलाव येथे नागरिकांसाठी नौकानयन व सुशोभिकरण करुन बोटींगची व्यवस्था करणार असून अहमदनगर महानगरपालिकेच्या मनपाच्या सर्व शाळा सुस्थितीत चांगल्या व ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करुन मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प महापौरांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment