पिता-पुत्रांना 1 वर्ष कारावास व 2 हजार रुपये दंड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

पिता-पुत्रांना 1 वर्ष कारावास व 2 हजार रुपये दंड.

 पिता-पुत्रांना 1 वर्ष कारावास व 2 हजार रुपये दंड.

कोरोना नाकाबंदी काळात पोलिसाला धक्काबुक्की करणे महागात पडले.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात नाकाबंदीत ड्युटी बजावणार्‍या तोफखाना पोलीस ठाणे अंमलदार सागर भास्कर तावरे यांना धक्काबुक्की करून मारहाण करणार्‍या मुकेश रघुनाथ चोपदार व त्यांचा मुलगा प्रसाद चोपदार रा.दिल्ली गेट या पिता-पुत्रांना जिल्हा न्यायालयाने भादंवि कलम 353 व 34 अन्वये दोषी धरून एक वर्ष साध्या कारावास व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आणि भादंवि कलम 332 व 34 अन्वये दोषी धरून सहा महिने साध्या कारावास व प्रत्येकी दोन हजार रूपये दंड, अशी शिक्षा जिल्हा न्यायाधीश श्रीमती बी. एस. गारे यांनी ठोठावली आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सागर भास्कर तावरे दिल्लीगेट येथे 28 जून 2020 रोजी करोना नाकाबंदी साठी कर्तव्यावर असताना दुचाकीवर आलेल्या चोपदार पिता-पुत्राला तावरे यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अडविले होते. यावेळी चोपदार पिता-पुत्राने अंमलदार तावरे यांच्या अंगातील शासकीय गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली. तसेच आम्हाला अडविण्याची तुझी हिंमत कशी झाली, असे म्हणत दमदाटी केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी अंमलदार तावरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोपदार पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एच. पी. मुलाणी यांनी करून न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयासमोर आलेले साक्षी-पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्यधरून आरोपी चोपदार पिता-पुत्राला कारावास व दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment