कोतवाली ‘डीबी’ची नव्याने स्थापना. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

कोतवाली ‘डीबी’ची नव्याने स्थापना.

 जुन्या पथकातील अनेकांना डच्चू.

कोतवाली ‘डीबी’ची नव्याने स्थापना.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील अवैद्य कत्तलखाने, अवैद्य बायोडिझेल विक्री प्रकरणातील तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागाच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्याची जबाबदारी असणारी 10 दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आलेली कोतवाली पोलीस ठाण्याची ‘डीबी’ जुन्या पथकातील अनेकांना डच्चू देत पुन्हा नव्याने स्थापना करण्यात आली असून शहरातील कत्तलखाने, गोमांसह व अवैध बायोडिझेलवर या पथकाचे आता विशेष लक्ष राहणार आहे.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पथकात पोलीस अंमलदार योगेश कवाष्टे, गणेश धोत्रे, दीपक रोहोकले, अमोलगाडे, रिंकू काजळे, सोमनाथ राऊत, सलीम शेख, नितीन शिंदे व अभय कदम यांचा समावेश आहे. डिबीचे प्रमुख म्हणून पोलीस अंमलदार कवाष्टे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागाच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी - राखण्याचे आव्हान असणार्‍या कोतवालीतील डीबी मागील 10 दिवसांपूर्वी तडकाफडकी बरखास्त करण्यात आली होती. या डिबीमध्ये प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे 16 कर्मचार्‍यांचा सहभाग यांच्यासहहोता. कोतवालीच्या डिबी पथकामध्ये दोन गट निर्माण झाले होते. दोन गटाच्या वादात दाखल गुन्ह्याची उकल करण्यात डिबी पथकाला अपयश आले होते. याशिवाय इतर ’उद्योग’ करण्यात या कर्मचार्‍यांनी भर दिला होता. त्यामुळेच पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्यावर डिबी बरखास्त करण्याची वेळ आली होती. आता पुन्हा नवी डिबी त्यांनी स्थापन केली असून, यात त्यांनी जुन्या अनेकांना डच्चू दिला आहे.

No comments:

Post a Comment