अल्पवयीन मुलीस पळवून अत्याचार. युवकावर पोक्सो, अॅट्रोसिटी कलमानुसार गुन्हा दाखल.
अहमदनगर : खाजगी हॉस्पिटल मध्ये नोकरी करणार्या अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्या सलमान बशीर शेख वय 21 जालना हल्ली रा. कोठला याचेवर अत्याचार, पोक्सो, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे करीत आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंगचा गुन्हा पूर्वीच दाखल होता. आता यामध्ये वाढीव कलम लावण्यात आले आहे. पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या आईने पोलिसांत जबाब दिला आहे. आरोपी शेख विरोधात अत्याचार, पोक्सो, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा भोंदविण्यात आला आहे.
अहमदनगर शहरात राहणारी अल्पवयीन मुलगी एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. यादरम्यान तिची सलमान शेख याच्यासोबत ओळख झाली. सलमान याने तिच्यासह घरच्यांना धमकावत तिला ऑगस्ट 2021 मध्ये मुंबई येथे पळवून नेले. त्या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तिच्या घरच्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मिसिंग दाखल आली होती.पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीसह युवकाचा शोध घेतला. ते मिळून आल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीसह तिच्या आईचा जबाब नोंदविला आहे.
No comments:
Post a Comment