राहुरीतील ताहाराबाद परिसरात बिबट्या जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

राहुरीतील ताहाराबाद परिसरात बिबट्या जेरबंद.

 राहुरीतील ताहाराबाद परिसरात बिबट्या जेरबंद.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
राहुरी ः ताहाराबाद येथील कारभारी कोंडाजी औटी यांच्या गोठ्यात गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्या शिरला. गोठ्यात दोन गाई होत्या.एका  गाईवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाईने त्याला प्रतिकार केल्याने बिबट्या घाबरला व जवळच गोठ्यातच असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यात त्याने स्वतः आसरा घेतला.
कारभारी औटी यांनी धाडस करत गोठ्याचा दरवाजा बंद केल्याने पुढे बिबट्याला पिंजर्‍यात पकडण्यासाठी ची मोहीम यशस्वी झाली.  वनविभागाने त्या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावला व मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाला.
बिबट्या खुराड्यात शिरताच कोंबड्या खुराड्या बाहेर पडल्या. गायीच्या प्रतिकारामुळे घाबरलेल्या बिबट्याने कोंबड्यावर हल्ला केला नाही. कारभारी औटी यांनी तत्काळ गोठ्याचा दरवाजा बंद करून वन विभागाला माहिती दिली. वनविभागाला  माहिती मिळताच राहुरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी गायकवाड हे आपल्या ताफा घेऊन घटनास्थळी पोहोचले.
माणिकडोह बिबटा निवारा केंद्र येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना देखील पाचारण करण्यात आले.तत्काळ पिंजरा लावला गेला. रात्री उशीरा दोन वाजता बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. याकामी सर्पमित्र कृष्ण पोपळघट ,चांगदेव किंकर, मुनीर देशमुख ,गुलाब शेख, किरण उदावंत ,नारायण झावरे ,सुखदेव औटी, बाळासाहेब औटी आदींनी सहकार्य केले .बिबट्या ची मादी सहा ते सात वर्षाची असून तिला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केद्रात आज नेण्यात आले .बिबट्या पाहण्यासाठी न ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली.

No comments:

Post a Comment