महिलेने मृत्यूनंतर दिले दोघांना जीवदान अन् दोघांना दृष्टी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

महिलेने मृत्यूनंतर दिले दोघांना जीवदान अन् दोघांना दृष्टी.

 महिलेने मृत्यूनंतर दिले दोघांना जीवदान अन् दोघांना दृष्टी.

कोरोनाकाळात सोलापुरात पहिल्यांदाच ’ग्रीन कॉरीडॉर’


सोलापूर ः
शहरातील एक महिला ब्रेनडेड झाल्यानंतर या महिलेमुळे दोघांना जीवदान मिळाले असून, दोन जणांना दृष्टी मिळाली आहे. ’ग्रीन कॉरिडॉर’द्वारे या महिलेच्या दोन किडन्यांचे पुणे व सोलापुरात प्रत्यारोपण करण्यात आले. तर, या महिलेचे दोन्ही डोळे शासकीय नेत्रपिढीला सोपविण्यात आले. कोरोनाकाळात सोलापुरात पहिल्यांदाच ’ग्रीन कॉरीडॉर’ करण्यात आला.
सोलापूर शहरातील एका 48 वर्षीय महिलेस खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांची स्थिती अत्यंत गंभीर झाली होती. डॉक्टरांनी उपचारादरम्यान केलेल्या तपासणीत त्या ब्रेनडेड झाल्याचे आढळले. तेव्हा डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना अवयवदानाची माहिती दिली.
त्यानंतर या महिलेचे पती व इतर नातेवाईकांनी अवयव दानाला होकार दिला. उपचार करणार्‍या डॉक्टरांनी कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर या महिलेला अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे या महिलेच्या कार्यक्षम स्थितीत असलेल्या अवयवांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये या महिलेच्या दोन्ही किडन्या व दोन्ही नेत्रांचे दान केले जाऊ शकते, हे स्पष्ट झाले. किडनीदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन रुग्णांचा शोध घेण्यात आला. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये एक, तर कुंभारी येथील रुग्णालयात एक रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळाली. यानंतर या अवयवांच्या वाहतुकीसाठी सोलापुरात पोलिसांकडून ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. या महिलेच्या किडन्या काढून त्यांचे प्रत्यारोपण करण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर करजखेडे, रुबी हॉल पुणेचे डॉ. श्रीवास्तव यांच्या नेतृत्त्वाखाली 50 जणांची एकूण चार पथके कार्यरत करण्यात आली. अवयव घेऊन जाणार्‍या विशेष ऍम्ब्युलन्सचा यात समावेश होता.
केवळ 150 मिनिटांत या दोन्ही किडन्यांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. प्रत्यारोपण झालेल्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली आहे. तसेच या महिलेच्या दोन्ही डोळ्यांचे दान शासकीय नेत्रपेढीला करण्यात आले आहे. प्रतीक्षा यादीतील व्यक्तींमध्ये दोन्ही डोळ्यांचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. महिलेच्या नातेकाईकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर तत्काळ ’ग्रीन कॉरिडॉर’ हाती घेण्यात आला. कोरोनाच्या काळात या प्रकारचे हे पहिलेच मिशन पूर्ण केले गेले. एकूण पाच पथकांचा यामध्ये समावेश होता. महिलेच्या दोन्ही किडन्या यशस्वीपणे गरजू रुग्णांच्या शरीरात प्रत्यारोपित झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment