संगणकाद्वारे जुगारीचा धंदा कोतवालीचा नालेगाव जुगार अड्ड्यावर छापा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

संगणकाद्वारे जुगारीचा धंदा कोतवालीचा नालेगाव जुगार अड्ड्यावर छापा.

 संगणकाद्वारे जुगारीचा धंदा कोतवालीचा नालेगाव जुगार अड्ड्यावर छापा.

युवकावर गुन्हा दाखल. मुद्देमाल जप्त.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रथमेश प्रमोद भाकरे वय 21 किंग्जगेट यास नागरिकांना संगणकाद्वारे हारजीतीचा जुगार खेळवताना आढळून आल्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केला असून संगणक, कीबोर्ड, सीपीयू, थर्मल बारकोड, स्कॅनर, प्रिंटर व रोख 700 रुपयांचा असा एकूण 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नालेगाव नेप्ती नाका येथील भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या संगणक जुगार अड्ड्यावर गुरुवारी दि 6 दुपारी चार वाजता कोतवाली पोलिसांनी छापा टाकला.
जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता प्रथमेश भाकरे  हा लोकांना संगणकावर हारजीतिचा जुगार खेळताना आढळला पोना.रोकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पिंगळे उपनिरीक्षक इंगळे पुना धोत्रे गोमसाळे अमोल गाडे दीपक रोखले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment