वाड्या-वस्त्यांपर्यंत विकासाची कामे घेऊन जाणार- आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 31, 2022

वाड्या-वस्त्यांपर्यंत विकासाची कामे घेऊन जाणार- आ. जगताप

 वाड्या-वस्त्यांपर्यंत विकासाची कामे घेऊन जाणार- आ. जगताप

बुरुडगावचा 15 वर्षापासून प्रलंबित पाणी प्रश्न आ.संग्राम जगतापांनी मार्गी लावला


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बुरुडगाव हे नगर शहराच्या जवळचे गाव आहे. मनपाच्या कचरा डेपोबरोबर सीना नदीचे प्रदूषित पाणी या गावातून वाहत आहे. अनेक वर्षापासून या गोष्टीचा ग्रामस्थांनी त्रास सहन केला आहे.  बुरूडगावच्या विकासासाठी गेल्या सात वर्षापासून प्रयत्न करीत आहे. एक-एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावत आहे.15 वर्षा पासून पिण्याच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न प्रलंबित होता आता तो मार्गी लावला आहे. गावठाण भागामध्ये नळाद्वारे पाणी देण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये वाड्यावस्त्यांवर ही पिण्याचे पाणी नळाद्वारे पोहोचवणार आहे याच बरोबर रस्त्यांचा प्रश्नही मार्गी लावला आहे, भिंगारनाल्यावरील पुलाचा प्रश्न ही मार्गी लागला आहे. आता सीनानदी वरील प्रश्नही मार्गी लागणार आहे. शहराच्या विकासाचा पुढील चाळीस वर्षाचा विचार करून पुढच्या पिढीसाठी कायमस्वरूपीचे काम उभे करायचे आहे त्यामुळे नगर शहर भविष्यकाळात महानगराकडे वाटचाल नक्कीच करेन, बुरूडगावच्या वाड्या-वस्त्यांन पर्यत नागरी सुविधा घेऊन जाणार असे प्रतिपादन आ संग्राम जगताप यांनी बुरुडगाव येथील पंधरा वर्षापासून रखडलेल्या पाणी योजनेचा शुभारंभा प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, बुरुडगावच्या अनेक वर्षाचा विकासाचा ’बॅकलॉक’ आमदार संग्राम जगताप यांनी भरून काढला आहे. सीना नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे बुरुडगावकरांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते, आ.संग्राम जगताप यांनी शहरातील मैलामिश्रित पाणी वाहून जाण्यासाठी अमृत भुयारी गटार योजनेचे काम सुरू केले आहेत आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याचबरोबर त्यांच्यामुळे गावच्या जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे बुरुडगाव पर्यंत लवकरच पथदिवे बसून देण्याचे कामही केले जाणार आहे.पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन गावच्या विकासाला सहकार्य करावे असे ते म्हणाले. पंधरा वर्षांपासून रखडलेली पाणी योजना सुरळीत झाल्यामुळे ग्रामस्थांनी आ.संग्राम जगताप यांचे आभार मानून गावामध्ये जंगी स्वागत केले. यावेळी बोलताना गावकरी म्हणाले की, आमदारांमुळे आमच्या गावच्या विकासाला चालना मिळाली आहे चारही बाजुंनी डांबरीकरणाचे रस्ते गावाला जोडली आहे,याच बरोबर दोन पुलाचे प्रश्न मार्गी लावले गावच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच झुकते माप दिले. महिलांच्या जिव्हाळ्याचा पाण्याच्या प्रश्न मार्गी लावळ्या बद्दल महिलांनी आनंद व्यक्त केला.
बुरुडगाव येथील पंधरा वर्षापासून रखडलेल्या पाणी योजनेचा शुभारंभा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले,बुरुडगाव सरपंच अर्चना कुलट,उपसरपंच शिराज सदस्य बापूसाहेब कुलट,सदस्य खंडू काळे,नवनाथ वाघ,ग्रामपंचायत सदस्य महेश निमसे,शितल ढमढेरे,ज्योती कर्डिले,जालिंदर कुलट,जालिंदर वाघ, राधाकिसन कुलट,मा.उपसरपंच ज्ञानेश्वर जंगम,ज्ञानदेव जाधव,विजय कदम,विलास दरंदले,सिताराम जाधव, सोमनाथ तांबे,अमित जाधव,संतोष यादव,संकेत कुलट,दिनेश शेळके,रंजना कुलट,मच्छिंद्र वाघ,राधाकिसन पाचारणे, चंद्रकांत पाचारणे तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment