वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी भाऊसाहेब भाकरे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी भाऊसाहेब भाकरे.

 वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी भाऊसाहेब भाकरे.


अहमदनगर -
वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या शेवगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर या महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र प्राप्त संस्थेच्या चेअरमनपदी बालम टाकळी ता.शेवगाव चे सुपुत्र श्री भाऊसाहेब बाबासाहेब भाकरे पाटील यांची तर व्हा.चेअरमन पदी श्री नवनाथ कचरू पोटफोडे तर मानद सचिव पदी श्री लक्ष्मण निवृत्ती सोलाट यांची अविरोध निवड झाली. तीनही निवड झालेल्या पदाधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष मा श्री नागो रावजी मगर साहेब, सरचिटणीस सयदजी जहिरूद्दीन साहेब, वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी स्वागत केले. पदाधिकारी निवडीची सभा दिनांक - 7/1/2022 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय शेवगाव येथे झाले. सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक के.के.आव्हाड यांनी काम पाहिले.श्री भाऊसाहेब भाकरे पाटील यांची चेअरमन पदासाठीची सूचना संचालक श्री संतोष आत्माराम जगताप यांनी केली तर सदर सुचनेस संचालक श्री माधव कारभारी पठारे यांनी अनुमोदन दिले. तर श्री नवनाथ कचरु पोटफोडे यांची व्हा.चेअरमन पदासाठी श्री शिवाजी रामदास चितळकर यांनी सूचना केली तर श्री सचिन पोपट मुळे यांनी सदर सूचनेस अनुमोदन दिले.

No comments:

Post a Comment