नगरकरांनी अनुभवला महाबळेश्वरचा फिल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

नगरकरांनी अनुभवला महाबळेश्वरचा फिल.

 नगरकरांनी अनुभवला महाबळेश्वरचा फिल.

थंडीचा कडाका.. रस्त्यावर दाट धुक्याची गर्दी.
दूधवाल्याची दूध घालण्याची घाई. मॉर्निंग वॉकची पाऊले स्तब्ध.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दिवसभर ऊन.. नी रात्री गारवा. सायंकाळी तापमानाचा पारा घसरला की गरम उबदार कपड्यांचा आसरा. पेटलेल्या शेकोट्या ग्रामीण भागातील हे चित्र शहरातही या काही दिवसात पहायला मिळतंय. आजची सकाळ मात्र धुक्यातच ऊजडली. दूध वाल्याची दूध घालण्याची घाई.. नि मॉर्निंग वॉक साठी युवक-युवती ज्येष्ठांची धावपळ आज सकाळी काही काळ थांबली, नोकरीसाठी जाणार्‍यां नाही या धुक्यातून जावा कसं हा प्रश्न पडला? रस्त्यावरच्या दाट धुक्याच्या गर्दीचा फिल नगरकरांना जणू महाबळेश्वरला असल्याचा आज जाणवला.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला असल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या हवामान बदलामुळे आलेल्या अवकाळी पावसाचे सावट सध्यातरी हटले आहे. दररोज हवामानात बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे दिवसभर कडक ऊन आणि रात्री गारठा पडू लागला आहे. सायंकाळी तापमानाचा पारा घसरत असून पहाटे धुक्यांची रस्त्यावर गर्दी केल्याने नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या थंडी आणि धुक्यांचा सामना मॉर्निंग वॅकला जाणार्‍या जेष्ठ नागरिकांना दूध विक्रेत्यांना, औद्योगिक वसाहतीमधील कर्मचार्‍यांना करावा लागत आहे.. या धुक्यामुळे ज्वारी सह, भाजीपाला, फळ फळबागांना पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे. आज संपूर्ण शहरात धुक्याची झालर पसरलेली होती.

No comments:

Post a Comment