कुविख्यात गुन्हेगार शंभू चव्हाण विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

कुविख्यात गुन्हेगार शंभू चव्हाण विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई.

 कुविख्यात गुन्हेगार शंभू चव्हाण विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई.

बेलवंडी, शिरूर, श्रीगोंदा, पारनेर पोलीस ठाण्यात या टोळीवर गुन्हे दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हयातील बेलवंडी, पारनेर पोलीस स्टेशन पुणे जिल्हयातील शिरुर पो.स्टे. हद्दीत गंभिर स्वरुपाचे संघटीतपणे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे ज्यामध्ये दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, दरोडयाची तयारी करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, फसवणुक करुन दरोडा टाकणे अशा स्वरुपाचे गुन्हे कट करून स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करणार्‍या कुख्यात गुन्हेगार शंभ्या उर्फ शंभु कुंज्या चव्हाण, वय 28 वर्षे, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर व त्याचे टोळीतील इतर 6 सदस्या विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्का) अन्वये कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची मंजुरी मिळाली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत त्यांचे विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्या अनुशंगाने बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी घडला होता. हा गुन्हा शंभ्या उर्फ शंभु कुंज्या चव्हाण, वय 28 वर्षे, रा. सुरेंगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर व त्यांचे टोळीने संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे करीता प्रभारी अधिकारी बेलवंडी पोलीस स्टेशन यांनी दिनांक 16/10/2021 रोजी (मोक्का) प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचेकडे  पाठविण्यात आला होता, सदर प्रस्तावास दिनांक 31 डिंसेबर 2021 रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलमाप्रमाणे वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळाली आहे.
या गुन्हयातील आरोपी: राजु जावेद चव्हाण, रा. सुरेगाव ता श्रीगोंदा (टोळीसदस्य), जितेंद्र रॉकेट चव्हाण, वय 25 वर्षे, रा पढेगाव ता श्रीरामपुर (टोळीसदस्य), घडयाळया हिरामण चव्हाण, वय 50 वर्षे, रा सुरेगाव ता श्रीगोंदा (टोळीसदस्य), रेबीन घडयाळया चव्हाण, वय 45 वर्षे, रा सुरेगाव ता श्रीगोंदा (टोळीसदस्य), बाबुश्या चिंगळया काळे, वय 20 वर्षे, रा वांगदरी ता श्रीगोंदा (टोळीसदस्य), ओकांर कुंज्या चव्हाण, वय 19 वर्षे, रा सुरेगाव ता श्रीगोंदा (टोळीसदस्य) 7) शंभ्या/शंभु कुंज्या चव्हाण, वय 28 वर्षे, रा सुरेगाव ता श्रीगोंदा, (टोळीप्रमुख) यांचे विरुद्ध शिरुर, पारनेर या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment