10 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 20 हजार कोटी जमा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

10 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 20 हजार कोटी जमा.

 10 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 20 हजार कोटी जमा.

पंतप्रधानांची नववर्षी शेतकर्‍यांना भेट.


नवी दिल्ली -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकर्‍यांना भेट दिली आहे.पंतप्रधानांनी पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्ताची रक्कम जमा केली आहे. यांतर्गत केंद्र सरकारने 10 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे.
शेतकर्‍यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून प्रत्येकी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. यामध्ये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. पीएम किसान पोर्टलनुसार या स्कीमचा पहिला हप्ता 1 डिसेंबरपासून 31 मार्चदरम्यान पाठवला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान शेतकर्‍यांच्या खात्ताय पाठवले जातात. तर तिसरा हप्ता हा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवला जातो. पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे न आल्यास पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266, पीएम किसान हेल्पलाईन नंबर: 155261, पीएम किसान हेल्पलाईन नंबर: 011-23381092, 23382401, पीएम किसान योजनेची नवी हेल्पलाईन: 011-24300606, ई-मेल आयडी: िाज्ञळीरप-ळलींर्सेीं.ळप या नंबरवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment