पाथर्डी नगरपालिका लिपिकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

पाथर्डी नगरपालिका लिपिकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

 पाथर्डी नगरपालिका लिपिकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पाथर्डीतील पेट्रोल पंपा शेजारच्या बियर बार च्या परवानगीसाठी नाहरकत मिळावी यासाठी लाच मागणार्‍या पाथर्डी नगरपालिका चा लिपिक अंबादास गोपीनाथ साठे यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीने 12 हजार रुपये स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. अंबादास गोपीनाथ साठे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी पाथर्डी पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे.
मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या नावाने पंचवीस हजाराची मागणी साठे याने केली होती. तडजोडीनंतर बारा हजार रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीमधे स्पष्ट झाले आहे. लिपिक साठे याने 26 नोव्हेंबर 2021 रोजी लाच मागितल्याची पडताळणी झाली होती. त्यानंतर अनेक वेळा सापळा लावूनही साठे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना सापडला नाही. पाथर्डी शहरातील एका पेट्रोल पंपाशेजारी असणार्‍या बिअरबारच्यापरवान्यासाठी ना हरकत मिळावी, असा अर्ज एका नागरिकाने केला होता. त्यासाठी मुख्याधिकारी  विभाग, लांडगे यांच्या नावे साठे याने 25 हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच ल च प त विभागाकडे तक्रार केली होती. त्यांनी पडताळणी केली तेव्हा  साठे याने लांडगे यांच्या नावाने 25 हजाराची मागणी केल्याचे व तडजोडीने बारा हजार रुपये देण्याचे ठरले. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हसन शेख, राहुल डोळसे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment