अवैध वाळू चोरणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 31, 2022

अवैध वाळू चोरणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई.

 अवैध वाळू चोरणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई.

पाच लाखाचा मुद्देमाल जप्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध वाळू चोरी होत असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की तरड गव्हाण ता . श्रीगोंदा जि  सिना नदीचे पात्रातुन एक इसम त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर चे ट्रॉली मध्ये विना परवाना बेकायदा बाळू भरून चोरी करीत आहे आता गेल्यास तो मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती त्यांनी लगेच पोलीस कॉन्स्टेबल प्रताप तानाजी देवकाते पो.कॉ टाके, पो.कॉ साठे  या पथकातील कर्मचार्‍यांना सदर ठिकाणी जावून  कारवाई करण्यास  सांगितले.
पोलीस स्टाफ व पंच असे नदी पात्रा कडे जात असताना 20.45 वा. चे सुमारास सिना नदीचे पात्रातून एक ट्रॅक्टर ट्रॉली असताना दिसला सदर ट्रॅक्टर चालक यांने पोलीसांना लांबुन पाहून त्याने त्याचे ट्रॅक्टरीचे ट्रॉली मधील बाजू जागीच खाली करुन टॅक्टर व ट्रॉलीसोडुन सदर चालक हा पळून गेला सदर ट्रॅक्टर चालकाचा आजू बाजूस शोध घेतला हो मिळुन आला नाही सदर ट्रॅक्टरचा व ट्रॉलीचा  स. फौ नवले खालील प्रमाणे 1) 4,00,000- रु किं लाल रंगाचा बिगर नंबर चा महेंद्रा कंपनीचा डी आय 575 मॉडेलचा त्याचा चेसीन एन एच ने 2 एम डी ई 0 167 असा असलेला जु वा किं 2) 1,00,000- रु. किं लाल रंगाची डम्पींग बिगर नबरची तिचे वर पिवळा पटटा असलेली दोन चाकी ट्रॉली  5,00,000-/ रु. किं वरील वर्णनाचे व किमतीची लाल रंगाचे महेंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर वरील चालक व मालक नाव गाव माहीत नाही यांने तरडगव्हाण ता. श्रीगोंदा अहमदनगर या गावचे शिवारातील सिना नदीचे पात्रालगत त्याचे ताब्यातील ट्रॅक्टरचे टॉली मध्ये वाळुची विना परवाना बेकायदा चोरीटी वहातुक करण्याचा प्रयत्न करताना मिळून आला आहे.  रोजी रात्री 20-45 वा चे सुमारास तरड गव्हाण ता. श्रीगोंदा जि अहमदनगर या गावचे शिवारातील सिंना नदीचे पात्रात महेंद्रा कंपनीचा डी आय 575 मॉडेलचा त्याचा चेसी नं . 0 167 या वरील चालक व मालक यांनी विना परवाना बेकायदा वाळुची चोरी करण्याचा प्रयत्न करताना मिळुन आला सदर ट्रॅक्टरी चालक व मालक यांचे विरुध्द भा.द.वि कलम 379.511 प्रमाणे फिर्याद आहे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रताप तानाजी देवकाते यांनी  फिर्याद दिली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव ,यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस कॉन्स्टेबल प्रताप तानाजी देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल टाके,पोलीस कॉन्स्टेबल साठे,सहाय्यक फौजदार नवले आदीच्या पथकाने कारवाई केली पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री नवले करत आहेत.

No comments:

Post a Comment