राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरतोय. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरतोय.

 राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरतोय.

हलक्यात घेऊ नका. उपमुख्यमंत्री अजित पवार
10 मंत्री व 20 आमदारांना कोरोनाची लागण.

“नाइट कर्फ्यूला कोणताही आधार नाही. कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी विज्ञानावर आधरित, पुराव्यांवर आधारित उपाययोजना आवश्यक आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजनांची एक यादीच करता येऊ शकेल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाइट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. भारतासारख्या देशांनी या विषाणूला आवर घालण्यासाठी वैज्ञानिक आधारांवर धोरण ठरवायला हवे.  
- डॉ. सौम्या स्वामीनाथन शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटना.


पुणे -
राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरतोय. लग्नसोहळे व राजकीय नेतेच कोरोनाचे सुपर स्पेडर ठरत आहेत. राज्यातील 10 मंत्री व 20 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हलक्या वर घेऊ नका, आपण दुसर्‍या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्याने नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांत राजकीय नेते, आमदार हे विविध लग्नसमारंभात सहभागी होताना दिसले. या लग्नसमारंभात मोठी गर्दी झाल्याचंही दिसून आले आणि हीच गर्दी कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरल्याचे दिसत आहे. जर राजकीय नेते आणि मंत्री महोदय नियमांकडे दुर्लक्ष करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन कसे होणार असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. सरकारने निर्बंध लावले असले तरी त्याचे पालन होताना दिसून येत नाहीअनेक जण मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणी करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. राज्यात 24 तासांत कोरोनाचे 8 हजार 67 , तर मुंबईत 5 हजार 428 नवे रुग्ण असून 454 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
राज्यातील कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाच्या बाबतीत कालच राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाच्या नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment