15 ते 18 वयोगटातील मुलांना सोमवारपासून कोरोना लस ः आयुक्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

15 ते 18 वयोगटातील मुलांना सोमवारपासून कोरोना लस ः आयुक्त.

 15 ते 18 वयोगटातील मुलांना सोमवारपासून कोरोना लस ः आयुक्त.


अहमदनगर :
शहरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांना सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीची ’कोव्हक्सिन’ची मात्रा देण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर, 60 वर्षावरील व्यक्ती व सहव्याधी असलेल्यांना यांना  10 जानेवारीपासून लशीची तिसरी मात्रा (प्रौकाशन डोस) दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी त्यांनी लशीची दुसरी मात्रा घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असावेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.
15 ते 18 वयोगटातील मुलांचे 3 जानेवारीपासून लसीकरण सुरू केले जाणार आहे. लसीकरणासाठी केवळ ’कोव्हॅक्सिन’ लसीचा वापर केला जाणार आहे. शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणास 16 जानेवारी 21 पासून सुरुवात झाली. आतापर्यंत 99.73 टक्के लाभार्थींना पहिली मात्रा तर 71 टक्के लाभार्थ्यांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत.
15 ते 18 वयोगटातील लाभार्थी 2007 किंवा त्यापूर्वी जन्म असलेला पात्र राहील. या लाभार्थ्यांना कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाइल क्रमांकाद्वारे लसीकरणासाठी नोंद करता येईल. ही ऑनलाइन सुविधा आजपासून (शनिवार) सुरू होईल. लसीकरण केंद्राच्या ठिकाणीदेखील नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे. शहरात 15 ते 18 वयोगटातील 19 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment