‘एमपीएससी’नं ते पत्र मागे घ्यावं : रोहित पवार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 31, 2021

‘एमपीएससी’नं ते पत्र मागे घ्यावं : रोहित पवार.

 ‘एमपीएससी’नं ते पत्र मागे घ्यावं : रोहित पवार.


मुंबई -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराबाबत असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय वक्तव्य करणार्‍या उमेदवारांच्या विरोधात कारवाईचा बडगा आयोगाकडून उगारण्यात आला आहे. आयोगाच्या कार्यशैलीबाबत अयोग्य भाषा वापरणार्‍या उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल असा इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे. आयोगाच्या या भूमिकेवरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आयोगाला आवाहन केलं आहे. एमपीएससी ने हे पत्र मागे घ्यावे, असं आवाहन रोहित पवार यांनी आयोगाला केलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, मुलांनी भाषा योग्य वापरावी, यात शंकाच नाही, पण चझडउ नेही अचानक परीक्षा रद्द करणं, निकाल वेळेत न लावणं, मुलांच्या शंकांचं वेळीच निरसन न करणं, हे टाळावं... तसंच भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घेऊन हे पत्र मागं घ्यावं, ही विद्यार्थ्यांच्यावतीने विनंती! असं ट्विटमध्ये आ.पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवल्या जात असलेल्या भरती प्रक्रियांबाबत अनेकदा प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे आणि सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांकडून चुकीच्या भाषेचा वापर करण्यात येत असल्याचे असे आयोगाचे म्हणणे आहे. अशा भाषेमुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला बाधा येत असून अशा उमेदवारांविरूद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे.तसेच आयोगाच्या स्वतःच्या अधिकारांचा वापर करून अशा उमेदवारांना परीक्षा देण्यापासून देखील वंचित ठेवण्यात येईल असं आयोगाने एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी देखील आयोगाने असभ्य भाषा वापरणार्‍या उमेदवारांना कारवाईचा इशारा दिला होता.
आयोगाच्या या भूमीकेवर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येत असून विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे 18 ते 20 लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणार्‍या पदांची संख्या असते चार ते पाच हजार. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करत नाही. मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानंतर कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्याच नाहीत.

No comments:

Post a Comment