1 फेब्रु.पर्यंत सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतून करा; अन्यथा गाठ मनसेशी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 15, 2022

1 फेब्रु.पर्यंत सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतून करा; अन्यथा गाठ मनसेशी.

 1 फेब्रु.पर्यंत सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतून करा; अन्यथा गाठ मनसेशी.

मनसेचा दुकाने, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, मोबाईल कंपन्यांना इशारा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील सर्व दुकानांवरील,आस्थापना तसेच हॉस्पीटल, मोबाईल कंपनीचे जाहिरात फलक पाट्या मोठ्या व ठळक मराठी भाषेत असाव्यात असे आदेश काढण्यात आलेले आहेत. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जवळपास पंधरा वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. अनेक वेळा आंदोलनेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आहे. या आंदोलनाला कुठेतरी आता यश येताना दिसत आहे तरी देखील नगर शहरातील अनेक दुकाने, हॉटेल्स, हॉस्पिटल इतर सर्व आस्थापना तसेच जाहिरातदार मोबाईल कंपन्या व इतर कंपन्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये नसून इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे या सर्वांनी आपल्या पाट्या 1 फेब्रुवारी पर्यंत मराठीत ठळक व मोठ्या अक्षरात कराव्यात अन्यथा गाठ मनसेशी आहे असा इशारा मनसेच्या नितीन भुतारे यांनी दिलेला आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात भुतारे यांनी म्हटले आहे की, जर येणार्‍या पंधरा दिवसात शहरातील मराठीत झाल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ आहे. त्या सर्व पाट्या या मनसेच्या वतीने करण्यात येतील आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान असावा व आपण स्वाभिमानाने त्या पाट्या मराठीत कराव्यात व गर्वाने मराठी भाषेचा गौरव आपण करावा असे आवाहन भुतारे यांनी नगर शहरातील दुकानदार व मोबाईल कंपन्या व इतर सर्व सभासदांना केले आहे.
मराठी भाषेचा गौरव करावा मराठी भाषेचा प्रसार व्हावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार पावले उचललेली आहेत तरी आपणही एक मराठी नागरिक मराठी अभिमान म्हणून आपण सर्वांनी या राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा व आपल्या दुकानांवरील हॉटेल्स वरील मोबाईल दुकानांवरील तसेच इतर सर्व आस्थापना हॉस्पिटल खाजगी क्लासेस शाळा या सर्वांवरील पाट्या मराठीत कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही करत आहोत आपण याची दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक फेब्रुवारी नंतर ज्या सर्व पाट्या मराठीत नसतील अशा सर्व पाट्या काळ्या करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आह.े जर भविष्यात संघर्ष होण्याची वेळ आली  तर गाठ ही मनसेची राहील याची नोंद सर्वांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे घ्यावी अशी विनंती मनसे व्दारे करण्यात आली आहे. मराठीला विरोध करणार्‍यांना आम्ही धडा शिकवू असा ईशारा देखील भुतारे यांनी दिला आहे. हे आंदोलन मनसेच्या वतीने एक फेब्रुवारी नंतर हाती घेण्यात येईल याची सर्व दुकाने, हॉटेल, मोबाईल कंपनी, शाळा, खाजगी क्लासेस, हॉस्पीटल तसेच ईतर सर्व आस्थापना यांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment