किरण काळेंनी घेतली आयजींची भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 15, 2022

किरण काळेंनी घेतली आयजींची भेट.

 किरण काळेंनी घेतली आयजींची भेट.

विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्याची मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आयटी पार्क पाहणी दरम्यान आम्ही कोणत्याही महिला भगिनीचा विनयभंग केलेला नाही. ज्यावेळी आम्ही शहरातील उच्चशिक्षित तरुणांची रोजगार देण्याच्या नावावर फसवणूक करणार्‍या आमदारांच्या तथाकथित आयटी पार्कला भेट देत भांडाफोड केला. त्यावेळी राजकीय दबावातून माझे व काँग्रेस कार्यकर्त्यांचे समाजात चारित्र्यहनन करण्यासाठी माता-भगिनींना पुढे करत विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला गेला. याचा सखोल तपास पूर्ण करत सदर खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नाशिक परिक्षेत्राचे विभागीय पोलिस उपमहानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून केली आहे.
शेखर हे इन्स्पेक्शनसाठी नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. काल रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात काळे यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांसह शेखर यांची भेट घेत आयटी पार्क प्रकरणी दाखल खोट्या गुन्ह्यासह शहरातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, अनेकांवर दाखल होणारे खोटे गुन्हे, बाजारपेठेतील वाहतूक समस्या आदी प्रश्नांवर निवेदन देऊन सविस्तर चर्चा करत लक्ष वेधले.
यावेळी आयटी पार्क प्रकरणात दाखल खोट्या गुन्ह्या बाबत काळे यांनी अनेक सवाल शेखर यांच्यासमोर उपस्थित केले. ज्या भगिनीने विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे ती भगिनी ज्यावेळी आम्ही आयटी पार्क पाहणी करत होतो त्यावेळी आयटी पार्कमध्ये उपस्थितीतच नव्हती. जी भगिनी उपस्थितीतच नाही अशा भगिनीचा विनयभंग कसा काय होऊ शकतो ? केवळ राजकीय दबावातून षडयंत्र रचत हा गुन्हा माझ्यावर अन्य आठ ते दहा काँग्रेस कार्यकर्त्यांवर दाखल केला गेला आहे. सदर घटना ही बनावट आहे. मी व माझ्या सहकार्‍यांवर बनाव रचून मला राजकिय आयुष्यातून उठवण्यासाठी रचलेला हा ’त्यांचा’ डाव आहे. आमचा पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. फिर्याद दाखल होऊन सुमारे साडेचार महिने झाले आहेत. याचा लवकरात लवकर तपास पूर्ण करत सत्य काय आहे ते जनतेसमोर आणण्यात यावे, अशी मागणी यावेळी काळे यांनी केली आहे. या वेळी नगर शहरातील ढासळलेल्या कायदा, सुव्यवस्थेच्या स्थीतीकडे देखील काळे यांनी शेखर यांचे लक्ष वेधले. गुन्हेगारांवर अधिक प्रभावीपणे पोलीस यंत्रणेची जरब निर्माण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरामध्ये चोर्‍या, मारामार्‍या, हनी ट्रॅप, धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या घटना, निनावी धमकी पत्रे अशा अनेक घटना सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कठोर पावले उचलण्याची मागणी यावेळी काळे यांनी केली.
यावेळी काळे यांच्यासह मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment