शहरातील खड्डे व स्ट्रीट लाईटच्या प्रश्नावर मनपावर समाजवादी पार्टीचा धडक मोर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

शहरातील खड्डे व स्ट्रीट लाईटच्या प्रश्नावर मनपावर समाजवादी पार्टीचा धडक मोर्चा

 शहरातील खड्डे व स्ट्रीट लाईटच्या प्रश्नावर मनपावर समाजवादी पार्टीचा धडक मोर्चा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील विविध विषयांवर महानगरपालिकेला निवेदन देऊन उत्तर मिळत नसून तसेच अहमदनगर शहरातील खड्डे व बंद असलेले स्ट्रीट लाईट चालू करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने महानगर पालिकेवर 27 डिसेंबर 2021 11 वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष अजीम राजे यांनी दिली.
अहमदनगर महानगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन ही कुठलेही प्रकारचे उत्तर मिळत नसल्याने शहराच्या विविध विषयांवर महापालिकेला समाजवादी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले परंतु महापालिकेच्या वतीने आतापर्यंत आमच्या एकही पत्राचे उत्तर दिलेले नसून तसेच रस्त्याचे रखडलेले काम यामुळे संपूर्ण शहरांमध्ये रस्ता छनी झाला असून रस्त्याचे काम चालू करण्यात यावे व शहरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट बंद असून शहर संध्याकाळच्या वेळेत अंधारात असून महानगरपालिका मात्र प्रकाशात आहे त्यामूळे रस्त्याचे काम व लाईट चे काम त्वरित चालू करण्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने 27 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अहमदनगर महानगर पालिकेला जाग येण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment