संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याहस्ते शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याहस्ते शुभारंभ

 संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याहस्ते शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
शिर्डी ः कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात बांधण्यात आलेल्या दोन शाळा खोल्यांचा शुभारंभ नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याहस्ते आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई विखे पाटील, राजेश परजणे, उपसरपंच विवेक परजणे, स्वच्छता दूत तथा समन्वयक सुशांत घोडके उपस्थित होते.
शैक्षणिक मुल्य जोपासण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या सायकलचे शाळेतील विद्यार्थींना तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या मिल्कींग मशिनचे विभागीय आयुक्तांच्याहस्ते शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या परिसरात मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि गांडूळ खत प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.कोपरगाव तहसील कार्यालयास विभागीय आयुक्तांची भेट विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज कोपरगाव तहसील कार्यालय आणि नगर परिषद कार्यालयास भेट देऊन तेथील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला.

No comments:

Post a Comment