अल्पसंख्यांक समाजामध्ये 100% लसीकरणासाठी नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरण करावे लागेल. - महापौर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 20, 2021

अल्पसंख्यांक समाजामध्ये 100% लसीकरणासाठी नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरण करावे लागेल. - महापौर

 अल्पसंख्यांक समाजामध्ये 100% लसीकरणासाठी नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरण करावे लागेल. - महापौर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना मुक्तीसाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असून अल्पसंख्यांक समाजामध्ये शभर टक्के लसीकरण होण्यासाठी नागरिकांपर्यंत लस घेऊन जावे लागणार आहे जागतिक आरोग्य संघटनेने देखील याला पुष्टी दिली आहे जिल्ह्यात लसीकरण वेगाने सुरू आहे सर्वांचे लसीकरण व्हावे या भावनेने समाजवादी पार्टीने व महापालिकेने बरोबर घेऊन नागरिकांपर्यंत जाऊनच देण्याचे कार्य सुरू केले आहे सर्वसामान्य नागरिकांना जास्त वेळ रांगेत न थांबता सहजासहजी उपलब्ध होणार असल्याची भावना महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी व्यक्त केली.
समाजवादी पार्टी व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने सर्जेपुरा येथील सुलतान हॉल येथे कोरोना लसीकरण शिबिराचे उद्घाटन लस देऊन करण्यात आले यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे, समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अजीम राजे, मीरा बिल्डर्स चे संचालक इरफान जहागीरदार, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुंशी, मन्सूर शेख, शहाबाज बॉक्सर, जहीर सय्यद, अली पब्लिक स्कूल के अंज़र खान, राजू जहागीरदार जहीर सय्यद, मुबीन सय्यद, राजेंद्र गायकवाड़, हुसैन शेख, मुन्ना भाई, परवेज खान, शफी खान, फैरोज बाबा, मोसिन सय्यद, नादिर भाई, तारीख शेख आदी उपस्थित होते.   अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांनी कमी संख्येमध्ये लस घेतलेली असून ते शभर टक्के लस घेण्याच्या आव्हानासाठी समाजवादी पार्टीच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले व लस घेतल्याने नागरिकांना कोणावर मात करता येत असल्याची भावना अजीम राजे यांनी व्यक्त केली तर नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लस घेण्यासाठी आव्हान मीरा बिल्डर्सचे संचालक इरफान जहागीरदार यांनी केले.

No comments:

Post a Comment