पोलीस व कंपनी प्रशासनाला दिल्या सूचना. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

पोलीस व कंपनी प्रशासनाला दिल्या सूचना.

 पोलीस व कंपनी प्रशासनाला दिल्या सूचना.

सनफार्मा कंपनी आग दुर्घटना स्थळाची राज्यमंत्री बच्चू कडूंनी केली पाहणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेला महिना पूर्ण होताच शहरातील एमआयडीसीत असलेल्या सनफार्मा कंपनीतील केमिकलला काल (बुधवारी) रात्री 10 वाजेच्या सुमारास आग लागली.या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी काल रात्री ( गुरुवारी) सव्वा दहा वाजता महाराष्ट्राचे कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सनफार्मा कंपनीला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस व कंपनी प्रशासनाला सूचना दिल्या. काल राज्य मंत्री बच्चू कडू यांनी सन फार्मा कंपनी मध्ये घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की या घटनेला ज्या कोणी यंत्रणा दोषी असतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश त्यांनी एमआयडीसी प्राधिकरण अधिकारी स्वप्नील देशमुख यांना दिले आहेत. तसेच या पुढील काळात अशा घटना घडू नयेत म्हणून कंपनीला सक्त ताकीद द्यावी. आग प्रतिबंध करण्यासाठी जेवढ्या यंत्रणा आहेत त्या बसवण्याचा उपाययोजना कराव्यात. सनफार्मा कंपनीतील आगीत एकाचा मृत्यू झाला मात्र मृत्यूची नोंद पोलिसांनी केलेली नाही. या संदर्भात बच्चू कडू म्हणाले, या आगीतील घटनेमध्ये कंपनीचे कर्मचारी रावसाहेब मघाडे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत तसेच या घटनेची सखोल चौकशी करून उद्याच्या उद्या गुन्हे दाखल करावेत असेही त्यांनी सांगितले आहे. चौकशीच्या नावाखाली पुन्हा एकदा वेळकाढूपणा झाला नाही तरच त्या मृत अधिकार्‍याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल नाही तर शासकीय रुग्णालयातील आगी प्रकरणी सात दिवसाची चौकशी महिना होउनही चालूच असल्यामुळे हा चौकशीचा फार्स पुन्हा होऊ नये, असे बच्चू कडू असे सांगितले. बच्चू कडू यांनी सूचना देऊनही अजूनही मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
एमआयडीसीतील आगीच्या घटनांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली इंडस्ट्रिअल कमिटी असते. या कमिटीला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ विरेंद्र बडदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment