सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर पवारांचे जिल्हा कोषागारात पेन्शन प्रस्ताव दाखल झाल्यानंतर उपोषण मागे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 24, 2021

सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर पवारांचे जिल्हा कोषागारात पेन्शन प्रस्ताव दाखल झाल्यानंतर उपोषण मागे

 सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर पवारांचे जिल्हा कोषागारात पेन्शन प्रस्ताव दाखल झाल्यानंतर उपोषण मागे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर पवार यांचे पेन्शन मंजूरी अंतिम प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याने सुरु करण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेतून एक वर्षापूर्वी सेवानिवृत्त होवून व राज्य कोषागाराने दोन महिन्यापूर्वी पेन्शन मंजूर करुन संस्था व शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अ.ब.क. फॉर्म व एम.टी.आर.42 वर सह्या दिल्या जात नव्हत्या. त्याची पुर्तता झाल्याने उपोषण बुधवार दि.22 डिसेंबर 2021 रोजी रात्री 9 वा. मागे घेण्यात आले.संस्थेचे सचिव शिवणकर निरिक्षक दत्तात्रय कन्हेरकर यांनी अंतिम मंजुरी प्रस्ताव सोपस्कर पूर्ण केला. त्यास विनाअट मंजूरी मिळाली.
मधुकर पवार उपोषणार्थींना जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष राजेंद्र लांडे, सचिव अप्पासाहेब शिंदे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश जाधव, सचिव रोहिदास कांबळे, उपाध्यक्ष एकनाथ जगताप, सदस्य प्रभाकर खणकर आदिंनी सक्रिय पाठिऐबा देऊन शिक्षण संचालक, उपसंचालक स्तरावर संपर्क करत उपोषणकर्त्यांची बाजू पटवून दिली, त्यात संघटनांना यश आले. पेन्शनपासून वंचितांनी शिक्षक संघटनांशी संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here